

Ayurvedic Guide to Sweet Foods: Benefits of Sugar, Jaggery and Honey
esakal
आ हार घेताना चव महत्त्वाची असते. जिभेवर आहाराचा स्पर्श झाला की तिथून मनाला मिळणारी तृप्ती किंवा आनंद असतो त्याच्यावरून आहार आवडेल की नाही, याचे गणित बांधलं जातं. आयुर्वेदामध्ये सहा रस किंवा सहा चव असं समजवलेलं आहे. गोड, आंबट, खारट, तिखट, कडू व तुरट हे सहा रस अर्थात चवी आपल्या आरोग्याकरिता उचित प्रमाणात घेणं अत्यंत आवश्यक असतं. आयुर्वेदात या चवींचं श्लोकातच रसांचं महत्त्व व प्रमाणाच्या हिशोबाने क्रम वर्णित केलं आहे.