

Exam Preparation Tips
sakal
फेब्रुवारी मार्च महिना म्हणजे संपूर्ण भारतभरामध्ये परीक्षेचे महिने म्हणून ओळखले जातात. शाळेमध्ये अगदी आनंदात जाणारी मंडळी परीक्षेच्या दिवसात मात्र बरीच व्यग्र आणि चिंतित दिसतात. फक्त विद्यार्थी मंडळीच नव्हे तर त्यांचे पालकसुद्धा या काळात भरपूर ताण घेताना दिसतात. परीक्षेत चांगले मार्क पडले नाही तर त्याचा “प” जाऊन नुसती ‘रिक्षा’ तुझ्या नशिबात राहणार आहे असेही धमकी देणारे पालक आपल्याला बरीच सापडतात. एकूणच, कितीही तयारी वर्षभर केलेली असली तरी परीक्षेचा वेळ हा थोडासा कठीणच असतो. वर्गात सगळं शिकवलेलं लक्षात ठेवणे, ऐन वेळेला घाबरून न जाता प्रश्न समजून त्याबद्दल सगळं सविस्तर लिहिण्याकरता आपल्या स्मृतीने मदत करणे व तसेच प्रतिकारशक्ती व्यवस्थित राहून कुठलेही सर्दी, ताप, खोकल्यासारखा आजार अगदी ऐन वेळेला त्रास नको द्यायला याचीही काळजी घेणे अत्यंत आवश्यक असतं.