
Health Benefits of Banana
sakal
Banana Uses for Mental Health: नेहमीचे सणवार, उत्सव, पूजा, पूजा, व्रतवैकल्ये अशा वेळी सहजपणे प्रसादासाठी वापरली जातात, ती केळी. हीच केळी उपवासाला चालतात. लहान मुलांना गर कुस्करून चालतात. ज्येष्ठ नागरिकांसाठीही खायला मऊ असतात व शिवाय इतर फळांच्या तुलनेत स्वस्तही असतात. त्यामुळे सर्व स्तरांतल्या नागरिकांना खाता येतात. हे फळ पोटभरीचे असून, शरीर पोषणाकरिता उत्तम पर्याय ठरतो.