Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

Health Care : वातावरण बदलातून हवेत गारवा वाढला की दमा तसेच श्वसनाचे विकार डोके वर काढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
Health Care
Health Care esakal

Health Care : अवकाळी पावसाचा आरोग्यावर परिणाम होतो. या दिवसांत ‘मॉर्निंग वॉक’ करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. वातावरण बदलातून हवेत गारवा वाढला की दमा तसेच श्वसनाचे विकार डोके वर काढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

अनेकजण व्यायामासाठी रस्त्यावर धावताना, चालताना दिसतात. पहाटेचे कोवळे ऊन व स्वच्छ हवा घेण्यासाठी धावपळ सुरू असते. सकाळचे वातावरण आरोग्याला पोषक असते. पण अवकाळी पाऊस त्यात विघ्न आणतो.

अशा दिवसात तयार होणारे प्रदूषणयुक्त धुके धोकादायक आहे. अशा वातावरणात दमा, ब्रॉन्कॉयटीस आणि श्वसनासंबंधी विकार होऊ शकतात. योग्य काळजी घेतली नाही, तर दमाग्रस्तांना हृदयविकाराचा, फुफ्फुसाचा अटॅक येऊ शकतो. सर्दी, ताप, खोकला, कफ यांचाही त्रास होऊ शकतो.

Health Care
Summer Health Care : उन्हाळ्यात हृदयविकारासह होऊ शकतात विविध आजार, असा करा बचाव

फिरताना काय काळजी घ्यावी

  • नाक, डोके आणि तोंडावर रुमाल बांधावा.

  • त्वचेची विशेष काळजी घ्यावी.

  • आजार असणाऱ्यांनी

  • पहाटे बाहेर पडू नये.

  • अंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करावा.

  • दुचाकीवरून जाताना वाऱ्यापासून बचाव करावा.

अवकाळी पावसाने थंडी वाढली की, दमा तसेच श्वसन विकारातील रुग्णांची श्वसनलिका व उपनलिका अरुंद होण्याचा धोका असतो. यामुळे पुरवठा कमी होऊन प्राणवायू कमी पडतो. कोरोनानंतर हे विकार वाढले आहेत. यामुळे अवकाळी पावसानंतर श्वसनाचे विकार वाढतात. ॲलर्जीक ब्राँकायटीस असलेल्यांना अवकाळीनंतरच्या वातावरणाचा त्रास वाढतो.

-डॉ. सुशांत मेश्राम, (श्वसनविकार रोगतज्ज्ञ तसेच विभागप्रमुख, मेडिकल-सुपर, नागपूर)

Health Care
Summer Health Care : बदलत्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम; कडक ऊन अन् अवकाळी पावसाने रुग्णांच्या संख्येत वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com