
Home remedies for dehydration during summer: सध्या तापमान वेगाने वाढत आहे. त्यामुळे शरीरावर विविध परिणाम होत आहेत. वाढत्या उन्हामुळे जास्त तहान लागणे, घाम येणे, लघवीचे प्रमाण कमी होणे असे बदल जाणवतात. अशा परिस्थितीत आहारात योग्य बदल केल्यास वाढत्या उष्णतेचा त्रास टाळता येणे शक्य आहे.
उन्हाळ्यात शरीरातील पाणी आणि आवश्यक पोषणतत्त्वे घामावाटे बाहेर पडतात. त्यामुळे निर्जलीकरण (डिहायड्रेशन) होण्याची शक्यता वाढते. यामुळे थकवा, चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडण्याचा धोका असतो. यासाठी दिवसभरात नियमितपणे पाणी पिणे आवश्यक आहे. या नैसर्गिक पेयांमुळे शरीराची जलपातळी संतुलित राहते आणि उष्णतेचा दुष्परिणाम कमी होतो. विशेषतः पाण्यात वाळा टाकल्यास त्याचे थंड गुणधर्म शरीराला फायदेशीर ठरतात, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.