
हिवाळ्यात घसादुखी या अतिशय कॉमन पण खूप त्रासदायक अशा लक्षणाचा विचार करताना त्याचे अनेक पैलू समोर आले. आणि तेव्हा हेही लक्षात आले की, हा त्रास दुर्लक्ष करण्यासारखा नाही! यामधूनच आपल्याला अजून एक विषय नीट कळला की, जेव्हा एखादा अवयव मुळातच अशक्त असतो, तेव्हा त्याला त्रास लगेच होतो.
आपले शरीर आणि त्यामधील अनेक अवयव, या प्रत्येकाची स्वतंत्र ताकद असते. त्यामुळे शरीर सुदृढ दिसले तरी आतील एखादा अवयव नाजूक असतो. त्याची ताकद तुलनेने कमी असते. अशा वेळी त्याला त्रास होण्याची शक्यता जास्त असते. (benefits of drinking milk in winter Throat Pain healthy lifestyle)
अशावेळी त्या विशिष्ट अवयवाची ताकद काशी वाढवता येईल? कारण आजार झाला की सगळेच उपचार घेतात, मात्र आजार होऊन गेल्यानंतर अशा अशक्त अवयवांची काळजी घेण्यासाठी आयुर्वेद शास्त्र मध्ये रसायन चिकित्सा सांगितली आहे.
यामध्ये त्या अवयवाची ताकद वाढवण्याची क्षमता असते. अशी ताकद वाढवता येणारी काही आहार द्रव्ये आहेत आणि काही प्रत्यक्ष औषधे आहेत. येथे आपण अगदी सोप्या अशा आहार द्रव्यांचा विचार करूया.
आपल्या आहारातील सगळ्यात महत्त्वाचे रसायन द्रव्य म्हणजे दूध. दूध हे मनुष्याला आजन्म सात्म्य असते. म्हणजेच, जन्मल्यापासून दूध पिण्याची सवय असल्याने त्या द्रव्यातून शरीराला पुनर्जीवित करणारे अनेक घटक सहज मिळतात.
रोज कोमट दूध पिणे हे घशासाठी एक उत्तम रसायन आहे. दूध हे शक्यतो गायीचे असावे. त्यातून आजकाल गीर गायीचे दूध मिळणे शक्य झाले आहे. मिळत असल्यास ते प्यावे. दूध पिण्यापूर्वी गरम करून घ्यावे. त्यामध्ये एक चिमूट हळद चूर्ण घालावे. नीट मिक्स करावे आणि प्यावे.
दूध सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी असे दोन वेळा १-१ कप घ्यावे. दूध घेण्याची ही सवय सातत्याने ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. काही दिवस करून सोडून देऊ नये. जवळ जवळ सहा महिने दररोज दूध पिण्याने घशाच्या ठिकाणी एक सशक्तता निर्माण होतो.
मात्र, दूध हे रसायन म्हणून पीत असताना तिखट, आंबट पदार्थ खाऊ नये. जोरात ओरडून बोलू नये. तसेच दूध हे फक्त प्लेन दूध हळद घालून घ्यावे. ते इतर कशात मिसळू नये. जसे मिल्कशेक, फ्रूट सॅलड करणे, अन्नपदार्थात दूध मिसळून खाणे, जसे, दूध-पोळी दूध-भात टाळावे. तरच दुधाचे संपूर्ण फायदे शरीराला मिळतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.