
South Indian breakfast for diabetes patients: आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोकांना मधुमेहाच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशावेळी तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. मधुमेहाचे रुग्ण सहसा असे मानतात की ते दक्षिण भारतीय पदार्थ खाऊ शकत नाहीत कारण बहुतेक पदार्थांत तांदूळवापरला जातो. तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो आणि म्हणूनच तो त्यांच्यासाठी चांगला नसतो. तुम्हाला कदाचित माहित नसेल, परंतु दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये अनेक स्वादिष्ट, फायबरयुक्त आणि कमी ग्लायसेमिक पर्याय देखील असतात, जे केवळ चव वाढवतातच असे नाही तर रक्तातील साखरेचे प्रमाण देखील संतुलित ठेवतात. हे पदार्थ कोणते आहेत हे जाणून घेऊया.