निर्मात्याचे पुस्तक वाचणे

गीतेचे तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी तुम्ही स्वतः कृष्ण बनले पाहिजे, कारण सत्याचा अर्थ लावला जाऊ शकत नाही, फक्त अनुभव घेतला जाऊ शकतो, तसेच हजारो वर्षांपासून चालत आलेल्या ग्रंथांमध्ये अनेक विकृती असण्याची शक्यता आहे.
Forget reading the Gita; you must become the Gita, for truth is an experience, not an interpretation.

Forget reading the Gita; you must become the Gita, for truth is an experience, not an interpretation.

Sakal

Updated on

सद्‍गुरू : गीतातत्त्वाचा काही भाग तुमच्या आत प्रवेश करू द्यायचा असेल, तर तुम्ही स्वतः कृष्ण असले पाहिजे... नाहीतर तुम्हाला ते समजू शकणार नाही. जरी मोठ्या प्रमाणात हे सगळीकडे घडत असले तरी, गीता वाचणे आणि बौद्धिकदृष्ट्या तिचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणे हे मूर्खपणाचे आहे. तुम्ही सत्याचा अर्थ लावू शकत नाही; तुम्ही फक्त सत्याचा अनुभव घेऊ शकता. तुम्ही सत्य समजून घेऊ शकत नाही, तुम्ही फक्त त्यात विरघळू शकता. हे असे काहीतरी नाही ज्याचे तुम्ही आकलन करू शकता, हे असे काहीतरी आहे ज्यात तुम्ही एकरूप होता. गीता वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी नाही. तुम्ही स्वतः गीता बनू शकता, पण तुम्ही गीता समजू किंवा शिकू शकत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com