Bike Tips For Summer : बाईक रायडिंग करताना अशी घ्या काळजी

सध्या कडक उन्हाळयाचे दिवस सुरू आहेत
Bike Tips For Summer
Bike Tips For Summer esakal

Bike Tips For Summer : सध्या कडक उन्हाळयाचे दिवस सुरू आहेत. भारतात बहुतेक सर्व भागात तापमान चाळीशीपार आहे. त्यामुळे उष्मघाताचा त्रास होण्याचा धोका जास्त असतो. तुम्ही दररोज बाईक चालवत असाल किंवा मित्रांसोबत दूर बाईक रायडिंगसाठी जाण्याचा प्लॅन करत असाल तर खबरदारी म्हणून काही नियम पाळणे आवश्यक आहे. अशाच काही बाईक रायडर्ससाठी उपयोगाला येणाऱ्या पाच टिप्स पाहणार आहोत.

Bike Tips For Summer
OpenAI : चॅट जीपीटीचं पुढचं व्हर्जन आणणार का?

सकाळी प्रवास सुरू करा

उन्ह्याळ्याच्या दिवसात दूरचा प्रवासाला निघत असाल तर सकाळी लवकर प्रवसाला सुरूवात करावी. कारण दुपारच्या कडक उन्हाच्या कचाट्यात सापडण्याआधी तुमच्या निश्चित केलेल्या ठिकाणी पोहोचाल. शक्यतो दुपारी 12 नंतरचा प्रवास टाळायला हवा. यादरम्यान चार-पाच तास आराम करा आणि प्रॉपर जेवण करा, पाणी प्या म्हणजे शरीराला उर्जा मिळेल. सायंकाळी पुन्हा पुढील प्रवासाच्या सुरूवात कराल.

Bike Tips For Summer
OpenAI Bug Bounty Program : शोधा ChatGPT मधील चुका आणि मिळवा 16 लाखांपर्यंतचं बक्षीस

सुती कपड्यांचाच वापर करा

सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे गर्मीत बाईक चालवत असताना अंगावर हलके आणि सुती कपडे घालायला हवं. यामुळे शरीरातील घाम सहज शोषला जातो. तसेच गर्मीपासून तुमचं पूर्ण संरक्षण व्हावं म्हणून पूर्ण बाह्या असलेले कपडेच घालायला हवीत.

Bike Tips For Summer
Car Tips : कार चालवतांना अचानक क्लच अडकतोय? या टिप्स करतील १००% मदत...

बाईक स्पीडने चालवू नका

उन्हाळाच्या काळात वेगाने बाईक चालवणे टाळायलं हवं. कारण वेगाने येणारे गरम वारे शरीरावर जोरानं आदळतात. त्यामुळे बाईक रायडिंग करतेवेळी अडथळा निर्माण होऊ शकतो आणि लवकर तहान लागते. यामुळे बॉडी डिहायड्रेट होऊन लवकर थकवा जाणवतो. त्यामुळे वेगाने बाईक चालवण्याचा मोह टाळायला हवा.

Bike Tips For Summer
Popular Celebrities Electric Cars : या 10 सेलिब्रिटींकडे आहेत कोट्यवधींच्या इलेक्ट्रिक कार

पिण्याचे पाणी सोबत ठेवा

उन्हाळ्याच्या काळात शरीरातून बाहेर प्रचंड घाम येतं. तुमच्या बॉडीतील पाण्याचं प्रमाण कमी कमी होतं. त्यासाठी थोड्या-थोड्या वेळाने पाणी पिण्याची सवय लावून घेण्याची आवश्यक आहे. सोबत नेहमी एक पाण्याची बॉटल कॅरी करायला विसरू नका. सोबत पाण्याच्या बॉटलीमध्ये ORS मिसळून ठेवा. हे मिश्रण पिण्यामुळे डिहायड्रेशनपासून संरक्षण होईल.

Bike Tips For Summer
Tata Cars : टाटा कंपनीनं वाढवल्या कार्सच्या किंमती, नेक्सॉनसह या कार्स 1 मे पासून होणार महाग

गरजेचं साहित्य सोबत ठेवा

उन्हाळ्याच्या दिवसात बाईक रायडिंग करत असाल तर सोबत गरजेचं साहित्य घ्यायला विसरू नका. सोबत दोन सुती टॉवेल्स, काही फळे, स्नॅक्स आणि पिण्याच्या पाण्याची बॉटल्स घ्या. सोबत एक कुलिंग वेस्टचं जॅकेट कॅरी कराल. यामुळे शरीराचं तापमान नियंत्रित राहण्यास मदत होईल आणि कमी घाम येईल.

Bike Tips For Summer
Curd Health Benefits : हाड ठिसुळ होण्यापासून बचाव करतो हा आंबट पदार्थ; कसे करायचे सेवन, वाचा

शरीराला मोकळी हवा मिळू द्या

उन्हाळ्यात बाईक चालवताना शक्यतो टाईट कपडे न घालता मोकळे-ढाकळे कपडे घालायल हवं. यामुळे शरीराला हवा मिळेल आणि घाम शोषण्यास मदत होईल. हे सर्व करत असताना डोक्यावरचं हेल्मेट काढायची चूक करू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com