

Bone Health Declines After 40
Sakal
डॉ. अजय कोठारी - कन्सल्टंट स्पाइन सर्जन
चाळिशीनंतर शरीराच्या हाडांमध्ये एक नैसर्गिक बदलांची प्रक्रिया सुरू होते. हाडांची घनता कमी होऊ लागते, स्नायूंच्या शक्तीमध्ये झपाट्याने फरक पडू लागतो आणि पडल्यानंतर फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. या सर्वांचा सर्वांत मोठा आधारस्तंभ म्हणजे - योग्य प्रमाणातील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी; पण अनेकांना त्याबद्दल अनेक गैरसमज असतात. काहीजण स्वतःहून सप्लिमेंट घेतात, काहीजण आहार पुरेसा आहे असे समजतात, तर काहीजण पूर्णतः दुर्लक्ष करतात.