
बोनी कपूर यांनी रात्रीचे जेवण पूर्णपणे बंद करून फक्त सूप घेतले, ज्यामुळे कॅलरी नियंत्रणात राहिल्या.
सकाळचा नाश्ता फक्त फळे, ज्यूस आणि ज्वारीच्या भाकरींवर आधारित होता, जो पौष्टिक आणि हलका आहे.
आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने संतुलित आहार घेऊन वजन कमी करणे शक्य आहे.
Boney Kapoor weight loss diet plan without gym: अनिल कपूर यांचे मोठे भाऊ, चित्रपट निर्माते बोनी कपूर हे आजकाल त्यांच्या चित्रपटांपेक्षा वजन कमी करण्यामुळे जास्त चर्चेत आहेत. 69 वर्षीय बोनी कपूर यांनी जीम किंवा डाएट न करता सुमारे 26 किलो वजन कमी केले आहे. त्यांचा नवा लूक पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. बोनी कपूर यांच्या वजन कमी करण्याच्या या परिवर्तनामुळे या वयात जिममध्ये न जाता वजन कमी करण्याचा विचार करणाऱ्यांची उत्सुकता वाढली आहे. चला जाणून घेऊया बोनी कपूर यांनी इतके वजन कसे कमी केले आहे.