
Importance of Prenatal Nutrition for Baby’s brain: मेंदूचे आरोग्य ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे जी जन्मापूर्वीपासून सुरू होते आणि आपण जगतो त्या प्रत्येक वर्षापर्यंत चालू राहते, असे वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी (डब्ल्यूएफएन) चे विश्वस्त पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी नमूद केले. गर्भधारणेपूर्वी पालकांचे आरोग्य आणि सवयी बाळाच्या भविष्यातील मेंदूच्या विकासाला आकार देतात. त्यामुळे चांगले पोषण, नियमित तपासणी आणि संतुलित जीवनशैली यावर लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत डॉ. मेश्राम यांनी व्यक्त केले.
डब्ल्यूएफएनच्या वतीने मंगळवार (ता.२२) रोजी १२ वा ‘जागतिक मेंदू दिन’ मेंदूचे आरोग्य आणि न्यूरोलॉजिकल आजारांबद्दल जनजागृती करण्यासाठी साजरा करत आहे. यावर्षीची संकल्पना 'सर्व वयोगटातील लोकांसाठी मेंदूचे आरोग्य’ आहे. डब्लूएफएनच्या १२५ सदस्य देशांमध्ये ही मोहीम राबवली जाईल, असेही डॉ. मेश्राम यांनी सांगितले.
डब्ल्यूएफएनचे अध्यक्ष प्रो. वुल्फगँग ग्रिसोल्ड म्हणाले, गर्भाशयात निरोगी मेंदूच्या वाढीसाठी आईचे शारीरिक आणि भावनिक कल्याण अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रसूतीपूर्व काळजी, योग्य पोषण आणि ताण व्यवस्थापन आई आणि बाळ दोघांचेही संरक्षण करण्यास मदत करते. जन्मादरम्यान श्वास गुदमरणे आणि डोक्याला दुखापत टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेतली पाहिजे.
बालपण शिकण्यासाठी, भावनिक वाढीसाठी आणि सामाजिक विकासासाठी महत्त्वाचे असते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कल्याण, मजबूत नातेसंबंध आणि स्वातंत्र्यासाठी निरोगी मेंदू आवश्यक आहे. मेंदूच्या आरोग्याशिवाय आरोग्य नाही. अरब प्रदेशात न्यूरोलॉजिकल परिस्थितीचा मोठा भार आहे.
ज्यामध्ये स्ट्रोक, मायग्रेन आणि डिमेंशिया ही प्रमुख कारणे आहेत. मेंदूच्या रोगामुळे एका वर्षात ४.४१ लाख मृत्यू झाले. ज्यापैकी बरेच टाळता येऊ शकले असते, असे पॅन अरब युनियन ऑफ न्यूरोलॉजिकल सायन्सेसचे माजी अध्यक्ष प्रो. युसेफ अल-सैद यांनी नमूद केले.
सुरक्षित वातावरण, लसीकरण आणि सकारात्मक पालकत्व हे आयुष्यभर मेंदूच्या आरोग्यासाठी एक भक्कम पाया तयार करतात. मेंदूचे आरोग्य हे क्षणिक नाही ते आयुष्यभराची वचनबद्धता आहे. आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यांपासून, बालपण, प्रौढत्व आणि वृद्धापकाळापर्यंत मेंदूचे रक्षण करण्यासाठी कृती करण्याचे या वर्षीच्या जागतिक मेंदू दिनी आवाहन करत असल्याचे डॉ. मेश्राम म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.