Brain Stroke Day: थंडीच्या दिवसांत ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका; ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय?

थंडीच्या दिवसांत ब्रेन स्ट्रोकचा धोका का वाढतो ते जाणून घ्या
Brain Stroke Day
Brain Stroke Dayesakal

थंडीच्या दिवसांत अनेकांना पांघरूणात खिळून बसावसं वाटतं. मात्र त्याचे तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात याची कल्पना तुम्हाला आहे काय? आज 29 ऑक्टोबर म्हणजेच ब्रेन स्ट्रोक डे आहे. आरोग्याबाबत सजग राहाण्यासाठी जाणून घेऊया ब्रेन स्ट्रोकबाबत.

ब्रेन स्ट्रोकची स्थिती म्हणजे काय?

यामध्ये ब्रेनच्या आर्टेरिज ब्लॉक होतात. इंडियन स्ट्रोक असोसिएशनच्या मते, कोरोनरी आर्टेरी डिसीजनंतर देशातील मृत्यूचे प्रमाण वाढण्यामागे ब्रेन स्ट्रोक कारणीभूत आहे. देशातील 18 लाख लोक ब्रेन स्ट्रोकने त्रस्त आहेत. २०१९ च्या एक रिपोर्टनुसार देशभऱ्यात होणाऱ्या मृत्यूपैकी ७.४ टक्के मृत्यूस ब्रेन स्ट्रोक जबाबदार आहे. (Health News)

Brain Stroke Day
Diabetes Health Care: झोप न झाल्यास वाढतं ब्लड शुगर; डायबिटीज रूग्णांनी एवढे तास घ्यावी झोप

२९ ऑक्टोबरला देशभऱ्यात ब्रेन स्ट्रोक डे साजरा केला जातो. देशभरात ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण वाढत चालले आहे. देशभरात थंडीला सुरूवात झाली असून थंडीच्या दिवसांत ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. तुमच्या काही लहान चुका ब्रेन स्ट्रोकचं कारण ठरू शकतं.

ब्रेन स्ट्रोकची कारणे

१) थंडीच्या दिवसांत लोक पांघरूणात असतात. त्यामुळे फिजीकल अॅक्टिव्हीटी कमी होऊन जाते. त्याने तुमचं ब्लड प्रेशर हाय होतं.

२) मानेची मॉलिश करताना ती हलक्या हाताने न झाल्यासही ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो.

३) हिवाळ्याच्या दिवसांत शरीराचं तापमान ढासळतं त्याला नॉर्मल ठेवण्यासाठी थोडी फार एक्सरसाइज करावी नाहीतर ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो.

४) स्त्रीयांच्या तुलनेत पुरुषांमध्ये ब्रेन स्ट्रोक जास्त असल्याचे दिसून आले.

ब्रेन स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी सोप्या ट्रिक्स

१) डायबिटीज आणि हाय बीपीच्या रूग्णांनी त्यांचं कोलेस्ट्रॉल तपासावं. आणि औषधे वेळेत घ्यावी.

२) वर्षातून एकदा हेल्थ चेकअप नक्की करावा. ज्यात ब्रेन रिलेटेड टेस्ट असेल. उदा, MRI,एंजिओग्राफी

३) हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करा.

४) स्ट्रेस मॅनेजमेंट शिका.

५) स्मोकिंग आणि ड्रिकिंग टाळा.

६) लठ्ठपणावर नियंत्रण ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com