Breakfast Skipping
Breakfast Skippingesakal

Breakfast Skipping : तुम्ही सकाळचा नाश्ता टाळतात? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार, सवय आजच बदला

आपल्या आरोग्यासाठी वेळच्या वेळी नाश्ता करणं आवश्यक असतं.
Published on

Breakfast Skipping Is Harmfull For Health : आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की, दिवसातलं सगळ्यात पहिलं खाणं म्हणजे नाश्त आरोग्यासाठी फार आवश्यक असतो. रात्रभर काही खाल्लेलं नसतं. त्यामुळे सकाळा उठून नाश्ता केल्यावर ग्लूकोजची कमीपण त्यामुळे भरून निघते. आरोग्यासाठी यातून पोषक तत्व मिळतात. नाश्ता न करणं तुमच्या आरोग्यावर कसा गंभीर परिणाम करू शकतो जाणून घेऊया.

टाइप २ डायबिटीस

महिलांनी रोज नाश्ता करणं फार आवश्यक असतं. ज्या महिला नाश्ता टाळतात त्यांना टाइप २ डायबिटीस होण्याचा धोका अधिक असतो.

हृदयासाठी आरोग्यदायी

नाश्ता आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला असतं. नाश्ता करणाऱ्यांपेक्षा न करणाऱ्यांमध्ये हृदय विकाराने मृत्यू होण्य़ाचा धोका जास्त असतो.

Breakfast Skipping
Healthy Breakfast : सकाळी नाश्त्यामध्ये नक्की काय खावे? वाचा सविस्तर

कँसरचा धोका

नाश्ता स्कीप केल्याने कँसरचापण धोका असतो. अभ्यासातून समोर आलं आहे की, जे लोक नियमित नाश्ता करत नाहीत त्यांच्यात कँसर आणि त्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता वाढते.

खराब मूड

नाश्ता न केल्याने दिवसभर तुमचा मूड खराब होऊ शकतो. जे लोक नाश्ता करत नाहीत त्यांच्यात कमी स्मरण शक्ती आणि जास्त थकवा जाणवतो, असं अभ्यासातून सिध्द झालं आहे.

वजन वाढणे

नाश्ता न केल्याने तुमचं वजन कमी होईल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. त्यामुळे शरीरात ग्लूकोज कमी होऊन जास्त गोड खाण्याची इच्छा होते आणि वजन वाढतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com