बाळासाठी स्तनपान नैसर्गिक अन् कधीही उपलब्ध असणारे पूर्ण अन्न

बाळासाठी स्तनपान नैसर्गिक अन् कधीही उपलब्ध असणारे पूर्ण अन्न

औरंगाबाद : ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त प्रसुती या आरोग्य केंद्रात होतात. परंतु, बाळाच्या (New Born Baby) जन्मानंतर नैसर्गिक स्तनपान करण्याचे मातांचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त नाही. स्तनपान हा नवजात शिशुंचा हक्क आहे. अन्न, आरोग्य व सुरक्षिततेची भावना या तीन गोष्टी नवजात बालकांची मुख्य गरज असते. यासाठी स्तनपानाचे (Breastfeeding) प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढविणे काळाजी गरज आहे. स्तनपान नैसर्गिक, स्वच्छ, स्वस्त कधीही उपलब्ध असणारे पूर्ण अन्न आहे. ‘स्तनपान हि एक सामुहिक जबाबदारी’ हे यंदाच्या सप्ताहाचे घोषवाक्य आहे. १ ते सात ऑगस्टदरम्यान जगभर १२० देशांत हा सप्ताह साजरा (Breastfeeding Week) होत आहे.

बाळासाठी स्तनपान नैसर्गिक अन् कधीही उपलब्ध असणारे पूर्ण अन्न
शिवसेना खासदार गवळीप्रकरणात सीएंच्या तक्रारीवर काय कारवाई केली?

वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. मंजुषा शेरकर यांनी स्तनपानाचे सांगितलेले महत्व

- मातेची स्तनपानाची मानसिक तयारी गर्भधारणेपासूनच करायला हवी.

- त्यामुळे प्रसुती वेदना असूनही ती स्तनपानासाठी उत्सुक असेल.

- प्रसुतीनंतर भेटीसाठी येणाऱ्या आप्तांची गर्दीही नैसर्गिक स्तनपानामध्ये बाधा.

- प्रसुतीनंतर बाळाला आईच्याच कुशीत ठेवावे.

- आपल्याकडे सहसा बाळ झोळीत, पाळण्यात किंवा नातेवाईकांकडे सांभाळण्यासाठी दिले जाते हे चुकीचे आहे.

- आईने बाळाला स्तनपान उठुन अथवा बसूनच करावे हे चुक आहे. कोणत्याही आरामदायी स्थितीत स्तनपान करु शकते.

- आईचा बाळाशी स्पर्श असायलाच हवा.

बाळासाठी स्तनपान नैसर्गिक अन् कधीही उपलब्ध असणारे पूर्ण अन्न
घरी बनवा डिलिशियस जिलेबी, 'या' ट्रिक्स वापरा

गैरसमज बाळगू नका

जुन्या रुढी, संकल्पना समाज मनात रुजलेल्या आहेत. प्रसुतीनंतर तीन दिवस दूध येत नाही अथवा कमी येते तसेच चिक दुधाबाबत पसरलेली अंधश्रद्धा या प्रसुतीनंतर एक तासाच्या आत स्तनपानाच्या उदासिनतेची कारणे आहेत. जुळी बाळ असतील तर दोघांना दुध पुरत नाही ही चुकीची संकल्पना तसेच दुध पाजण्यासाठी योग्य स्थिती घेता येत नाही. ‘सिझेरियन’प्रसुतीनंतर दुध कमी येते हा गैरसमज असतो. नवजात बालक जन्मल्याबरोबर मध, साखर, पाणी देणे हेही अत्यंत चुकीचे आहे.

स्तनपान जागृतीचे उद्दीष्टे

- नवजात शिशुंचा मृत्यूदर कमी करणे.

- बाळ जन्मल्यानंतर एक तासाच्या आत आईचे दुध पाजण्यास सुरुवात करणे.

-फक्त आईचेच दुध सहा महिण्यांपर्यंत सुरु ठेवणे.

-स्तनपानाचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत आणणे.

-‘कांगारु मदर केअर’चा प्रसार करणे.

-बेबी-फेंडली रुग्णालयांची स्थापना करणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com