Breastfeeding Tips : स्तन्यदा मातांनी घ्यावा 'असा' आहार; तुमचे बाळ राहील निरोगी

आईचे दूध केवळ बाळाच्या विकासासाठी चांगले नाही. तर, ते बाळाच्या पचनसंस्थेसाठी देखील खूप चांगले आहे.
Breastfeeding Tips
Breastfeeding TipsEsakal

साधारण 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून पाळला जातो. बाळासाठी आईचे दूध फार महत्त्वाचे असते. नवजात बाळाला 6 महिने फक्त आईचेच दूध पाजावे, असं विज्ञानाच्या आधारे डॉक्टरांकडून सल्ला दिला जातो. कारण त्यात सर्व प्रकारचे पोषक घटक असतात. जे बाळाच्या विकासासाठी खूप महत्वाचे आहे. आईचे दूध केवळ बाळाच्या विकासासाठी चांगले नाही. तर, ते बाळाच्या पचनसंस्थेसाठी देखील खूप चांगले आहे. यासोबतच ते बालकांची प्रतिकारशक्ती मजबूत करते आणि इतर प्रकारच्या आजारांपासूनही संरक्षण करते. म्हणूनच अनेकदा आईचे दूध बाळाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. जेव्हा एखादी स्त्री आपल्या बाळाला स्तनपान करते तेव्हा तिने तिच्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे.

Breastfeeding Tips
Benefits of breast feeding : स्तनपानाचं महत्व आणि फायदे

दूध वाढवण्यासाठी प्रथिनेयुक्त पदार्थ खावे. मांस, अंडी, दुग्धजन्य पदार्थ, बीन्स, मसूर आणि सीफूड, विविध प्रकारचे धान्य, फळे आणि भाज्या यांचे नियमित सेवन करावे.स्तनपान करणार्‍या मातांनी पाण्याची विशेष काळजी घ्यावी. दिवसातून जितक्या वेळा तुम्ही बाळाला दूध पाजता तितक्या वेळा एक ग्लास पाणी प्यावे.

स्तनपान करणा-या महिलांनी आहारात जास्तीत जास्त ड्रायफ्रूट्सचा समावेश करावा. जसे की, अक्रोड, काजू, मनुका, पिस्ता. हे सर्व पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर खावे. ज्या महिला आपल्या बाळाला दूध पाजतात त्या महिलांनी केळी आणि अंजीर खावे. पण अजून एक गोष्ट लक्षात घ्या की अंजीर जास्त खाऊ नका. 

Breastfeeding Tips
Alcohol in breast feeding : स्तनदा मातांनी दारू प्यायल्यास काय होते ?

ज्या महिला आपल्या बाळाला दूध पाजतात त्यांनी बडीशेपचे पाणी प्यावे. त्यामुळे त्यांचे पचन चांगले राहते आणि पोट थंड राहते.दररोजच्या आहारात अधिक प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा. प्रथिनयुक्त आहारामध्ये तुम्ही मूग डाळ, तूर डाळ, सोया, राजमा, चणे आणि मोड आलेले कडधान्य यांचा समावेश करावा. त्याच बरोबर दूध, लो फॅट चीज, कॉटेज चीज, बटर मिल्क, दही यांचा देखील आहारात समावेश करा.

आहारात पालक, मेथी, शेपू अशा हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. रोजच्या आहारात एक तरी पालेभाजी खावी. या भाज्या स्तनपान करणार्‍या मातांचे दूध वाढवण्यासाठी प्रभावी आहे.लोह, प्रथिने आणि कॅल्शियम समृद्ध असलेले पदार्थ खा. लोहाच्या चांगल्या स्त्रोतांमध्ये मसूर, तृणधान्ये, हिरव्या पालेभाज्या, मटार आणि मनुका यांसारखी सुका मेवा यांचा समावेश करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com