
Simple Exercises and Foods to Improve Lung Function: आजकाल कमी हालचाल झाली तरी अनेकांना लगेचच धाप लागते. पायऱ्या चढताना किंवा थोडं चालल्यानंतरच दम लागायला लागतो. अनेकदा याकडे वय वाढणं किंवा वजन जास्त असणं हे कारण समजून दुर्लक्ष केलं जातं. पण न्यूट्रिशनिस्ट रमिता कौर यांच्या मते, धाप लागण्यामागे शरीरातील काही लपलेली समस्या असू शकतात. योग्य वेळेत लक्ष दिलं नाही, तर यामुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो.
चालताना श्वास फुलणे, धाप लागणे यामागे बऱ्याचदा वाढलेले वजन कारणीभूत असू शकते असे आपल्याला वाटते पण, न्यूट्रिशनिस्ट रमिता कौर यांनी धाप लागण्याची याव्यतिरिक्त वेगळी पाच मुख्य कारणं सांगितली आहेत.
लो हिमोग्लोबिन किंवा लोहाची कमतरता
रक्तातील हिमोग्लोबिन आणि लोह कमी झाल्यामुळे शरीरात ऑक्सिजनची योग्य पातळी नसेल, तर थोड्या हालचालींनंतरच थकवा जाणवतो.
कमकुवत फुफ्फुसे किंवा शॅलो ब्रीदिंग
प्राणायाम, व्यायाम याची सवय नसल्याने खोल श्वास घेण्याची सवय नसल्याने फुफ्फुसांची क्षमता कमी होते.
व्हिटॅमिन बी12 आणि व्हिटॅमिन डीची कमतरता
शरीरासाठूी आवश्यक पोषणाच्या अभावामुळे थकवा आणि दम लागण्याचा त्रास होतो.
धाप लागण्याचा त्रास कमी करण्यासाठी काही सोपे उपाय:
बीट आणि आवळ्याच्या रसाने दिवसाची सुरुवात
दिवसाची सुरूवात बीट आणि आवळ्याच्या ज्यूसने करा. हे शरीरातील हिमोग्लोबिन पातळी नैसर्गिकरित्या वाढवण्यास मदत करते.
शरीरात साचलेले टॉक्सिन्स आणि कमी स्टॅमिना
शरीर शुद्धीकरण व्यवस्थित न झाल्यामुळे शरीरात घाण साचते. परिणामी शरीरातील स्फूर्ती कमी होते.
हॉर्मोनल असंतुलनामुळे मेटाबॉलिझम मंदावतो
वाढत्या वयासोबत, बदलती जीवनशैली, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे आपल्या शरीरातील हॉर्मोन्सचे संतुलन बिघडते. यामुळे शारीरिक क्षमता कमी होते ज्यामुळे अनेकदा श्वास घ्यायला त्रास होतो किंवा थोडेसे चालले तरू लगेच धाप लागते.
कडीपत्ता आणि भिजवलेले मनुका रोज खा
कडीपत्ता आणि भिजवलेले मनुका दररोज खायला सुरुवात करा. हे थकवा कमी करून लोहाची कमतरता भरून काढते.
मिलेट्स आणि तूपाचा आहारात समावेश
याव्यतिरिक्त आहारात मिलेट्स आणि तूपाचा समावेश करा. हे स्टॅमिना वाढवतात आणि शरीराला आवश्यक ऊर्जा देतात.
जेवण चुकवू नका
तसेच वजन कमी करण्यासाठी दिवसातून एकच जेवण जेवणे आणि उपाशी राहिल्यास थकवा अधिक वाढतो. हे टाळले तर धाप लागणे टाळता येते.
अनुलोम-विलोम
रोज ५ मिनिटं हा प्राणायाम केल्याने छाती मोकळी होते. फुफ्फुसांची क्षमता देखील वाढते.
भ्रमरी
हा प्राणायाम करताना शरीरात कंपनं तयार होतात. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. परिणामी संपूर्ण शरीराला व्यवस्थित रक्तपुरवठा होतो ज्यामुळे प्रसन्न आणि ताजेतवाने वाटते. तसेच फुफ्फुसांची देखील क्षमता वाढल्याने धाप लागण्याची समस्या उद्भवत नाही.
स्टेअर इंटरव्हल प्रॅक्टिस
दररोज स्टेअर इंटरव्हल प्रॅक्टिस करा. सुरुवातीला एक मजला हळू चढा, मग थोडी विश्रांती घ्या. हे दिवसातून २ ते ३ वेळा आवर्जून करा. यामुळे स्टामिना वाढतो आणि फुफ्फुसांची क्षमता वाढते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.