
गेले बरेच दिवस माझ्या दोन्ही तळपायांची आग होते आहे. मधुमेहाची तपासणी केली असता रक्तशर्करा नॉर्मल आहे असे आढळले. यासाठी काय करता येईल याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे.
... सौरभ गर्ग
उत्तर : प्रश्र्नावरून आपल्या व्यवसायाचे वा कामाचे स्वरूप कळू शकलेले नाही. फार जास्त चालणे होत असेल किंवा एकाच स्थितीत फार वेळ बसले जात असेल तर अशा प्रकारे तळपायांची जळजळ होऊ शकते. यासाठी आपल्या मज्जासंस्थेला मदत करणे, तसेच रक्तातील रक्ताभिसरण वाढेल यासाठीही मदत करणे अत्यंत आवश्यक असते.
सध्या तरी रोज रात्री झोपण्याआधी संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेल हलक्या हातांनी पायांना वरून खाली या दिशेत लावावे. दिवसातून एक किंवा दोन वेळा पादाभ्यंग करण्याचा फायदा मिळू शकेल. पादाभ्यंगाबद्दल सविस्तर माहिती डॉ. मालविका तांबे यूट्यूब चॅनेलवर मिळू शकेल. रोज संतुलन पित्तशांती गोळ्या, संतुलन प्रवाळपंचामृत मोती युक्त गोळ्या, संतुलन गुलकंद स्पेशल घेण्याचा फायदा मिळू शकेल.