Caffeine and Heart Health
sakal
- डॉ. मृदुल देशपांडे, MBBS, फंक्शनल मेडिसिन नूट्रिशनिस्ट
कॉफी, चहा, ग्रीन टी या सगळ्यातील प्रमुख घटक म्हणजे कॅफिन. बऱ्याच लोकांसाठी दिवसाची सुरुवात कॅफिनशिवाय होतच नाही. कॅफिन हृदयासाठी चांगले की वाईट, यावर बरीच संशोधने झाली आहेत. फंक्शनल मेडिसिनमध्ये आपण केवळ ‘कॅफिन वाईट’ किंवा ‘कॅफिन चांगले’ असा निष्कर्ष काढत नाही, तर तुम्ही नक्की ‘कशी’ कॉफी पिताय यावर सगळं ठरतं. व्यक्ती, तिचा मेटाबॉलिझम आणि संपूर्ण जीवनशैली यांचा अभ्यास करून उत्तर शोधलं जातं.