AI Detects Cancer: ChatGPT ने वाचवला जीव? AI च्या मदतीने उघड झालं कॅन्सरचं रहस्य!

How ChatGPT Helped Detect Cancer In Real Life: डॉक्टर चुकले पण ChatGPT ने दिला अचूक इशारा – AI च्या मदतीने कॅन्सरचं वेळीच निदान!
AI Detects Cancer
AI Detects Cancer sakal
Updated on

Real Stories Where AI Detected Cancer Before Doctors: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आता फक्त तंत्रज्ञान किंवा संवाद साधण्यासाठी वापरला जात नाही, तर त्याचा वापर अनेक इतर क्षेत्रांमध्येही वाढला आहे. त्यातली एक महत्त्वाची बाब म्हणजे AI टूल्सचा वापर आरोग्य क्षेत्रात होऊ लागला आहे. काही लोकांनी असा अनुभव सांगितला आहे की, ChatGPT सारख्या AI टूल्सने त्यांना गंभीर आजार ओळखण्यात मदत केली.

उदाहरणार्थ, काही वेळा असं होतं की डॉक्टरसुद्धा एखाद्या आजाराचं नेमकं कारण शोधण्यात अडचणीत येतात. अशा वेळी काही लोकांनी ChatGPTसारख्या AI टूल्सचा उपयोग करून आपल्या लक्षणांबद्दल माहिती दिली आणि त्यावरून AI ने काही शक्यतेचा अंदाज लावला.

हे ऐकायला थोडं आश्चर्यकारक वाटू शकतं, पण अशा टूल्सनी काही वेळा योग्य दिशेनं मार्गदर्शन केल्याचं अनुभवातून समोर आलं आहे. त्यामुळे हे टूल्स डॉक्टरांच्या कामात मदतीची भूमिका बजावत आहेत. वेळेवर योग्य निदान झालं, तर उपचार सुरू करणंही लवकर शक्य होतं – आणि त्यामुळे आजार बरा होण्याची शक्यता वाढते. AI चं हे एक वेगळंच आणि उपयोगी रूप आहे, जे आजच्या घडीला अनेक लोकांच्या मदतीला येत आहे.

AI Detects Cancer
Head And Neck Cancer Symptoms: तुम्हाला अचानक मानेत गाठ जाणवत आहे? दुर्लक्ष करू नका! असू शकते 'या' गंभीर आजाराचे लक्षण

AI च्या मदतीने कॅन्सरचं निदा

अमेरिकेतील लॉरेन बॅनन यांना 2024 च्या सुरुवातीला त्यांच्या हाताच्या बोटांमध्ये वेदना होऊ लागल्या. डॉक्टरांनी ते रुमेटॉइड आर्थरायटिस असल्याचं सांगितलं. काही दिवसांनी त्यांना तीव्र पोटदुखी सुरू झाली आणि वजन झपाट्याने म्हणजे सुमारे 6 किलोने घटलं. डॉक्टरांनी हे ऍसिडिटीमुळे होत असल्याचं सांगितलं, पण लॉरेन यांना त्यानंतरही अस्वस्थ वाटत होतं.

एवढ्या सगळ्या चाचण्या करून, डॉक्टरांशी संपर्क करूनही निदान झाल्याचे समाधान वाटत नव्हते. म्हणून त्यांनी ChatGPT च्या AI टूलचा सल्ला घ्यायचं ठरवलं. त्यांनी आपली सगळी लक्षणं ChatGPT ला सांगितली. त्यावरून AI ने ‘हाशिमोटो डिजीज’ हा एक थायरॉईडशी संबंधित ऑटोइम्यून आजार अस्याचा अंदाज लावला.

जेव्हा लॉरेनने हा अंदाज डॉक्टरांना सांगितला, तेव्हा त्यांनी तो नाकारला. कारण त्यांच्या घरात असा आजार कोणालाही झाला नव्हता. पण लॉरेनचा हट्ट होता, म्हणून त्यांनी तपासणी करून घेतली. आणि आश्चर्य म्हणजे, त्यांच्या थायरॉईड ग्रंथीत दोन कॅन्सरयुक्त गाठी सापडल्या.

लॉरेन म्हणतात, “जर मी ChatGPT चा सल्ला घेतला नसता, तर कदाचित हा कॅन्सर शरीरात इतरत्र पसरला असता. AI मुळेच माझा जीव वाचला.”

AI ने दिला रक्ताच्या कॅन्सरचा इशारा

दुसऱ्या एका उदाहरणात पॅरिसमध्ये राहणाऱ्या 27 वर्षांच्या एका तरुणीनेसुद्धा AI चा प्रभावी अनुभव शेअर केला आहे. 2024 च्या सुरुवातीला ती झोपताना खूप घाम येणं, आणि त्वचेवर सतत खाज येणं यामुळे खूप त्रास होती. तिने वेगवेगळ्या तपासण्या करून घेतल्या, पण डॉक्टरांना काही ठोस कारण सापडत नव्हतं.

शेवटी, काही उत्तर मिळावं म्हणून तिने ChatGPT कडून सल्ला घेण्याचं ठरवलं. तिने आपली सगळी लक्षणं सांगितली, आणि AI ने शक्यता व्यक्त केली की ही लक्षणं ब्लड कॅन्सरची असू शकतात.

AI Detects Cancer
Sam Altman Baby: पाटलांच्या पाळण्यात झोपतो जगाला चॅटजीपिटी देणाऱ्याचा मुलगा, किंमत ऐकून बसेल धक्का

सुरुवातीला हे खूपच धक्कादायक वाटलं, पण काही महिन्यांनी तिच्या थकव्याचं प्रमाण वाढलं आणि छातीतही वेदना जाणवू लागल्या. पुन्हा एकदा तपासणी केल्यावर डॉक्टरांना तिच्या फुफ्फुसाजवळ मोठा ट्यूमर सापडला. शेवटी, "हॉजकिन लिम्फोमा" हा रक्ताचा कॅन्सर तिला असल्याचं निदान झालं. आणि नेमकं हेच ChatGPT ने आधीच सूचित केलं होतं.

तू म्हणते, “जर मी AI कडून मार्गदर्शन घेतलं नसतं, तर कदाचित निदान खूप उशिरा झालं असतं. माझ्या शरीरात काय घडतंय, याची कल्पनाच आली नसती.”

वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही

ChatGPT किंवा अशा AI टूल्स डॉक्टरांची जागा घेऊ शकत नाहीत, पण लक्षणांवरून संभाव्य आजाराची शक्यता ओळखून वेळेवर तपासणी करण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. योग्य वापर केला, तर अशा टूल्समुळे आपण आरोग्याबाबत अधिक सजग राहू शकतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com