

IIT Roorkee Research Finds Cow Urine Distillate May Reduce Chikungunya Virus in Lab Tests
sakal
चिकनगुनिया म्हणलं की डास, ताप, आणि असह्य सांधेदुखी डोळ्यांसमोर येते. बाकी त्रास कमी झाला तरी सांधेदुखी काही केल्या कमी होत नाही. पण आता याच्यावर प्रभावी उपाय म्हणून पारंपारिक ज्ञानाचाही आधार घेतला जात आहे. आयआयटी (IIT) रुडकीच्या एका नव्या अभ्यासात गौमूत्र अर्काने प्रयोगशाळेतल्या चाचण्यांमध्ये चिकनगुनिया विषाणूवर लक्षणीय परिणाम दाखवला आहे. त्यामुळे या संशोधनाची चर्चा सुरू झाली आहे.