

Can Your Pillow Really Cause Cancer | Doctors Debunk the Viral Health Claim
sakal
Does Sleeping on the Same Pillow Lead to Cancer: अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका दाव्यामुळे अनेक जणांची झोपच उडाली आहे. या दाव्यानुसार, जुनी उशी जास्त वेळ वापरल्यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो, असं म्हटलं जातं. काही लोकांनी तर उशीला डायरेक्ट "कॅन्सरचं घर" अशी उपमा दिली आहे. पण या दाव्यात प्रत्यक्षात किती तथ्य आहे? उशीमुळे खरोखर कॅन्सर होतो का, की हा फक्त सोशल मीडियावर पसरलेला आणखी एक गैरसमज आहे? याबाबत तज्ज्ञांचं मत काय आहे, ते समजून घेऊया.