

Cancer Research
esakal
New Delhi: कर्करोगाच्या पेशींची वाढ, रक्तवाहिन्यांशी त्यांचा संपर्क आणि नसांशी असलेले नाते आता एका छोट्या चिपवर अभ्यासता येणार आहे. स्वीडनमधील लिंकोपिंग विद्यापीठ आणि इटलीतील पॉलिटेक्निको दी मिलानो येथील संशोधकांनी डोके आणि मानेच्या कर्करोगासाठी नवे ‘ऑर्गन-ऑन-चिप’ मॉडेल विकसित केले आहे. ट्यूमरच्या आजूबाजूचे वातावरण त्याच्या वाढीवर आणि औषधांच्या परिणामांवर कसा प्रभाव टाकते, याचा अभ्यास करण्यासाठी या मॉडेलचा उपयोग होणार आहे.