

19 Cancers Driven By Body Fat!
esakal
How Extra Weight Feeds Cancer Cells: आजकालची बैठी जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लठ्ठपणा (Obesity) ही एक जागतिक समस्या बनली आहे. अनेकदा आपण वजन वाढण्याकडे फक्त 'लूक' किंवा 'फिटनेस'च्या दृष्टीने पाहतो. पण, नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनाने सर्वांचेच डोळे उघडले आहेत. लठ्ठपणा हा फक्त शरीराचा आकार बदलत नाही, तर तो १९ प्रकारच्या कर्करोगांचा (Cancer) धोका लक्षणीयरीत्या वाढवू शकतो, असा धक्कादायक खुलासा एका नव्या संशोधनातून झाला आहे. त्यामुळे निरोगी वजन राखणे हे आता केवळ सुंदर दिसण्यासाठी नाही, तर जीवघेण्या आजारांपासून स्वतःला वाचवण्यासाठी अत्यंत गरजेचे झाले आहे.