
आशा नेगी - कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत
नुकतीच माझी केमोथेरपी संपली होती आणि टार्गेट थेरपी सुरू झाली होती. सकाळी जिमला गेले आणि परतताना नारळ पाणी प्यायला थांबले. पाणी घेत असताना समोर एक कपल माझ्याकडे एकटक नजरेने पाहताना दिसले. केमोमुळे माझ्या डोक्यावरचे केस गेले होते, अगदी छोटे केस डोक्यावर डोकावत होते. ते एकटक पाहत होते. शेवटी, त्या गृहस्थांनी विचारलेच, ‘‘माफ करा; पण ही कोणती नवीन हेअर स्टाईल आहे? ’’ त्यांचा प्रश्न ऐकून मला आश्चर्य वाटले. मी हसत उत्तर दिले, ‘‘ही एक्स्पेन्सिव्ह हेअर स्टाईल आहे, सर! तुम्ही अफोर्ड नाही करू शकणार. ही मिळवण्यासाठी तुम्हाला कॅन्सर व्हावा लागतो, आणि त्यावर उपचार करणे खर्चिक असते.’’