Carpal Tunnel Syndrome : मनगटातील नसेवरचा तीव्र दाब ; सीटीएस

Carpal Tunnel Syndrome Symptoms and Treatment : मनगटातील मीडियन नर्व्हवर दाब आल्यामुळे कार्पल टनेल सिंड्रोमचा त्रास होतो. हाताच्या बोटांमध्ये मुंग्या, जळजळ, बधीरपणा आणि ताकद कमी होणे अशी लक्षणे दिसतात. रात्री त्रास वाढू शकतो आणि दैनंदिन कामांवर परिणाम होऊ शकतो.
Carpal Tunnel Syndrome Symptoms and Treatment

Carpal Tunnel Syndrome Symptoms and Treatment

esakal

Updated on: 

सकाळची वेळ होती. ४८ वर्षांच्या निशा शर्मा नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात पोळ्यांसाठी कणिक मळत होत्या. मात्र, अचानक त्यांच्या उजव्या हाताची ताकदच गेली आणि कणकेचा गोळा हातातून निसटून खाली पडला. काही महिन्यांपासून त्यांच्या उजव्या हाताचा अंगठा, मधलं बोट आणि अनामिका या बोटांमध्ये विचित्र मुंग्या येणे, जळजळ आणि बधीरपणा जाणवत होता. कधीकधी या संवेदना मनगटापासून वर कोपराच्या दिशेने पसरल्यासारखी वाटायच्या. ​रात्री तर त्यांची झोपच उडाली होती.

Loading content, please wait...