सद्गुरू : तुम्हाला ज्या लोकांची चीड येते, तुम्ही त्यांच्यावर प्रेम करायला हवे, याबद्दल बरीच चर्चा होते. जे लोक तुम्हाला चीड आणतात, त्यांच्यावर तुम्ही प्रेम करू शकत नाही, तुम्ही प्रेम करण्याचे फक्त नाटक करू शकता.
तुम्ही प्रेम करण्याचे नाटक करण्याऐवजी, फक्त एवढेच पाहा, की त्यांच्यामुळे तुम्हाला चीड येत आहे आणि याकडे लक्ष द्या, की तुम्हाला त्यांच्यामुळे चीड का येत आहे? तुम्हाला त्यांच्यामुळे चीड येत आहे, कारण ते लोक तुम्ही जशी अपेक्षा करता त्या प्रमाणे नाहीत; ते लोक तुम्हाला हवे तसे नाहीत.