navratri durgamata
sakal
शिव-शक्ती, प्रकृती-पुरुष असे म्हणताना अस्तित्वाला शक्तीची गरज असते हे समजते. शक्ती आहे तोपर्यंत अस्तित्व आहे आणि शक्तीचा ऱ्हास सुरू झाला की अस्तित्वही धोक्यात येते. या शक्तीला पुन्हा चैतन्याचा स्पर्श व्हावा, पुन्हा तजेला यावा, यासाठी भारतीय संस्कृतीने ‘नवरात्र’ या नऊ रात्रींसाठी चालणाऱ्या उत्सवाची योजना केली.