

Hina Khan’s Journey: Strength in Vulnerability
Sakal
आशा नेगी
(लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत)
आजच्या काळात कॅन्सरसारख्या गंभीर आजारांबद्दल बोलण्याची भीती अनेकांनी मागे सारली आहे. विशेषतः सेलिब्रिटी ज्यांना समाज सतत उजेडात ठेवतो, ते आता आपल्या आजारांविषयी मोकळेपणाने बोलू लागले आहेत. परंतु ही परिस्थिती नेहमी अशी नव्हती. एकेकाळी एखाद्या कलाकाराला, खेळाडू, राजकारणी किंवा प्रख्यात व्यक्तीला कॅन्सर झाला, तेव्हा ते लपवून ठेवत असत. कारण त्यांना वाटायचं की, ही माहिती बाहेर गेली, तर त्यांच्या करिअरला, त्यांच्या कामाच्या संधींना आणि त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसेल.