

RJ MITTE CEREBRAL PALSY HEALTH AWARENESS
sakal
CEREBRAL PALSY CAUSES SYMPTOMS AND TREATMENT: हॉलिवूडमधील लोकप्रिय मालिका 'ब्रेकिंग बॅड'मध्ये वॉल्टर व्हाईट ज्युनियरची भूमिका साकारणारा अभिनेता RJ Mitte याच्या निधनाची बातमी समोर आली आहे. RJ Mitte याला लहानपणीच सेरेब्रल पाल्सी (Cerebral Palsy) या वैद्यकीय स्थितीचं निदान झालं होतं. या स्थितीमुळे शरीराच्या हालचाली, स्नायूंचा समन्वय आणि शरीराचा तोल राखण्यात अडचणी येऊ शकतात. मात्र, Mitteने अभिनयासोबतच दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांसाठीही काम केलं. त्याच्या निमित्ताने जाणून घेऊया, सेरेब्रल पाल्सी म्हणजे नेमकं काय, हा आजार कशामुळे होतो, त्याची लक्षणं कोणती आणि उपलब्ध उपचार कोणते?