
Early Detection of Cervical Cancer Risk in Women
sakal
गर्भाशयमुखाचा (सर्व्हायकल) कर्करोग हा भारतातील महिलांसाठी वाढता आरोग्य धोका ठरत आहे. जागतिक स्तरावर महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगांपैकी हा चौथ्या क्रमांकावर असून, भारतात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे, मात्र आता या कर्करोगाचा धोका आधीच ओळखता येऊ शकतो, असे राज्य सरकारच्या कामा रुग्णालयातील तीन वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञांच्या नव्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. हा अभ्यास इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायन्स अँड रिसर्च या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाला आहे.