Cervical Pain : सतत बसून काम करणाऱ्यांना हमखास जाणवते ही समस्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cervical Pain

Cervical Pain : सतत बसून काम करणाऱ्यांना हमखास जाणवते ही समस्या

मुंबई : सर्व्हायकल पेन म्हणजे मानेमध्ये वेदना होणे. पण जेव्हा त्याची स्थिती गंभीर होते, तेव्हा ती वेदना संपूर्ण हातामध्ये खांद्याद्वारे (खांदादुखी) होते. बोटांपर्यंत देखील पोहोचू शकते आणि खांद्यापासून कंबरेपर्यंतच्या भागाचा ताबा घेऊ शकते. आपल्या शिरांमध्ये विद्युत प्रवाह सोडल्याप्रमाणे टोचणी जाणवते.

का जाणवतो सर्व्हायकल पेन ?

सर्व्हायक स्पॉन्डिलोसिस किंवा मानदुखी ही मणक्यामध्ये वय-संबंधित झीज होण्यासाठी एक सामान्य संज्ञा आहे. यामुळे मान दुखणे, मान कडक होणे आणि इतर लक्षणे होऊ शकतात. कधीकधी या स्थितीला संधिवात किंवा मानेचा ऑस्टियोआर्थराइटिस म्हणतात. हे वयाशी संबंधित आहे. कारण त्याचे खरे स्वरूप काही दशकांपूर्वीपर्यंत वृद्ध लोकांमध्ये असायचे.

मात्र जीवनातील वाढलेली निष्क्रियता आणि एकाच जागी बसून तासनतास काम करण्याच्या पद्धतींमुळे ही वेदना तरुणाईचा फास बनली आहे. कॉम्प्युटर, लॅपटॉपवर तासनतास व्यग्र असणाऱ्या १८ ते २५ वयोगटातील तरुणांमध्येही ही वेदना झपाट्याने वाढत आहे.

सर्व्हायकल पेनची लक्षणे

मान कडक होणे, दुखणे, मानेला सूज आणि वेदना, मानेचे स्नायू दुखणे, मान हलवताना वेदनांसह आवाज, चक्कर येणे, डोकेदुखी, वारंवार मळमळ.

मानदुखीवरील उपचार

मानदुखीवरील वेदनांवर असा कोणताही प्रभावी उपचार नाही जो एकदा केला की तुम्हाला ही समस्या कधीच होणार नाही. जर हे वयानुसार झाले असेल तर औषधांद्वारे उपचार केले जातात. जर हे जीवनशैली, बैठे काम यामुळे होत असेल तर सुरुवातीला औषधोपचार करून त्यावर उपचार केल्यानंतर तुम्ही तुमची बसण्याची स्थिती बदलली पाहिजे, कामाच्या दरम्यान ब्रेक घ्या आणि नियमित व्यायाम करा, चालणे, धावणे, स्किपिंग करणे आवश्यक असते.

वेदनाशामक औषधांचे सेवन करून या वेदनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे दुखण्यात काही काळ आराम मिळतो पण किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो. केवळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घ्या.

सूचना : या लेखात नमूद केलेल्या पद्धती, आणि दावे केवळ सूचना म्हणून घ्यायचे आहेत. आम्ही त्यांची पुष्टी करत नाही. असे कोणतेही उपचार/औषध/आहार करण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.