Child Eye Care Tips : सतत पडणारा मोबाईलचा प्रकाश मुलांच्या डोळ्यांसाठी घातक! तज्ज्ञ सांगतात...

पालकांनो आताच सावध व्हा. मुलांना मोबाईल, टीव्हीपासून दूर ठेवा, असा सल्ला नेत्ररोग तज्ज्ञांनी दिला आहे.
Child Eye Care Tips
Child Eye Care Tipsesakal

...तर डोळ्याच्या बाहुल्या होतील लहान

Child Eye Care Tips : अलीकडे लहान मुलांपासून तर तरुणाई आणि मोठेदेखील सतत मोबाईल बघण्याच्या आहारी गेले आहेत. लहान मुलांना तर उठता, बसता मोबाईल हवा असतो. हा एकप्रकारचा नवीन आजार सुरू झाला आहे. पण डोळ्यावर सतत मोबाईलचा प्रकाश पडल्याने डोळ्यातील बाहुली लहान होते. त्यानंतर प्रकाश सहन न होऊन डोळ्यांची क्षमता कमी होऊ लागते. डोळे कोरडे पडू लागतात. यामुळे पालकांनो आताच सावध व्हा. मुलांना मोबाईल, टीव्हीपासून दूर ठेवा, असा सल्ला नेत्ररोग तज्ज्ञांनी दिला आहे.

खेळण्याऐवजी हाती आले मोबाईल

बाळ आईच्या गर्भात असताना दृष्टी वाढण्याची प्रक्रिया सुरू होते. गर्भात बाळाच्या डोळ्यांना जपण्याची गरज आहे. त्यासाठी गर्भवतीच्या आहारात दूध, अंडी, फळे, मासे असे नैसर्गिक पदार्थ असावे. जन्माला आलेल्या मुलांचे डोळे नाजूक असतात. पूर्वी मूल जसजसे मोठे होत जायचे तसतशी त्याला विविध खेळणी खेळण्यासाठी मिळायची. मात्र अलीकडे वर्षभराचे वय होण्यापूर्वीच त्या मुलाच्या हातात मोबाईल नावाचे नवे खेळणे दिले जात आहे. हे अतिशय घातक आहे.

Child Eye Care Tips
Eye Care: उष्णतेमुळे डोळ्यांची जळजळ- आग होतेय? 4 उपाय, डोळ्यांना वाटेल थंड

मोबाईलमुळे भविष्यातील धोके

जवळ पाहताना डोळ्यात पाणी येणे, जळजळ होणे

मुलांच्या दुरदृष्टीवर परिणाम, चिडचिड वाढते

झोपेचे आजार वाढतात, एकाग्रता भंग होणे

कानातून आवाज ऐकू येणे, कान दुखणे

लक्षात न राहणे

व्यायामापासून दुरावण्याचा धोका,

डी जीवनसत्त्वाचा अभाव (Health)

Child Eye Care Tips
Eyes Care : डोळ्यांसाठी रामबाण उपाय! या सुपरफूड्सचा आहारात नक्कीच समावेश करा

डोळ्याचे आरोग्य जपण्यासाठी हे करा

मोबाईलऐवजी वाचनाची, गाणी ऐकण्याची सवय लावावी

मुलांनी मैदानी खेळ खेळावे

आहारात हिरव्या पालेभाज्यासह दूध अंडी, मासे असावे

मोबाईलच्या रेडिऐशनपासून डोळ्यांना दूर ठेवा

डोळ्यांचे व्यायाम करावे

सात ते आठ तास व्यवस्थित झोप घ्यावी (Eye Care)

स्वतःचे काम बिनदिक्कत व्हावे यासाठी लहान मुलांच्या हाती स्मार्ट फोन देण्यासाठी अलीकडे पालकच आघाडीवर आहेत. मुलांना मिळणाऱ्या क्षणिक आनंदासाठी मुलांच्या डोळ्यांवर आपण आघात करीत आहोत. मोबाईलवर खेळण्याचे प्रमाण वाढल्याने लहान मुलांमध्ये डोळ्यांचे आजार वाढले आहेत. डोळे येण्याची जशी साथ असते, तशी अलीकडे लहान मुलांना चष्मे लागण्याची साथ असल्याचे जाणवते. विशेष म्हणजे ‘इंटरटेन्टमेंट हा प्रकार मोबाईलवर करू नये.

-डॉ. नीलेश गादेवार, सहयोगी प्राध्यापक, मेडिकल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com