Growth Hormone
Growth Hormoneesakal

Growth Hormone : तुमची मुलं इतर मुलांच्या तुलनेत लहान दिसताय? असू शकतात 'ही' कारणं, वेळीच लक्ष द्या नाहीतर...

ग्रोथ हार्मोनच्या कमतरतेमुळे मुलांची उंची थांबू शकते, मूल अशक्त होऊ शकते आणि त्याच्या एकूण आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो.

Growth Hormone : वाढ संप्रेरक (GH), ज्याला सोमाटोट्रोपिन देखील म्हणतात, हा मेंदूतील पिट्यूटरी ग्लँडमधून रिलीज होणारा हार्मोन आहे. हा हार्मोन शरीराच्या विकासासाठी खूप महत्त्वाचा आहे. याच्या मदतीने मुलांची उंची वाढते, हाडांची वाढ होते आणि स्नायूंचाही विकास होतो. ग्रोथ हार्मोन योग्यरित्या असणे खूप महत्वाचे आहे. त्याच्या कमतरतेमुळे मुलांची उंची थांबू शकते, मूल अशक्त होऊ शकते आणि त्याच्या एकूण आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो.

ग्रोथ हार्मोनचं कार्य?

ग्रोथ हार्मोन (GH) मुलांच्या वाढीस चालना देण्यासाठी शरीराच्या अनेक भागांवर कार्य करते. या हार्मोनच्या मदतीने, मुलांचा विकास होतो, स्नायू आणि हाडे मजबूत होतात. याशिवाय शरीरातील चरबीचे वितरणही गरजेनुसार होते. मात्र एकदा हाडांमध्ये (एपिफिसेस) ग्रोथ प्लेट्स जोडल्या गेल्यानंतर मुलांची उंची वाढत नाही. ग्रोथ हार्मोन देखील सामान्य रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. जर मुलांमध्ये पुरेसा ग्रोथ हार्मोन नसेल तर त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तर प्रौढांमध्ये, यामुळे शरीरातील चरबी वाढणे आणि उच्च रक्त पातळी यासह विविध समस्या उद्भवतात." (Lifestyle)

Growth Hormone
Child Care Tips: मुले एकलकोंडी अन्‌ चिडचिडी होताहेत? आयुर्वेदानुसार मुलांच्या आहार, निद्रा व दिनक्रमात हे बदल करा

मुलांमध्ये ग्रोथ हार्मोनची कमतरता असल्यास दिसतात ही लक्षणं

मुलांमध्ये ग्रोथ हार्मोनच्या कमतरतेमुळे (GHD) मुलांची वाढ खुंटते. मुलांमध्ये जीएचडीची मुख्य लक्षणे मुलाच्या जन्मानंतर तीन वर्षांनी दिसून येतात, जसे की-

इतर मुलांच्या तुलनेत उंचीची वाढ कमी असणे.

वयाच्या मानाने लहान दिसणे.

खराब केस आणि नखे.

उशीरा दात येणे.

पौगंडावस्थेत येण्यास 3 ते 7 वर्षे विलंब.

लहान मुलांमध्ये आणि मुलांमध्ये कमी रक्तातील साखरेची पातळी (हायपोग्लाइसेमिया).

नवजात मुलांचे लिंग खूप लहान असणे (मायक्रोपेनिस). (Health)

Growth Hormone
Happy Hormones : हॅप्पी हार्मोन्सची काळजी घ्या आणि आनंदी आयुष्य जगा

ग्रोथ हार्मोनची कमतरता जाणवल्यास किंवा उंची न वाढल्यामुळे मुले डॉक्टरांकडे जातात. शारीरिक लक्षणे, हाडांचे एक्स-रे आणि काही चाचण्यांच्या मदतीने ग्रोथ हार्मोनच्या कमतरतेचे निदान केले जाऊ शकते. मात्र ग्रोथ हार्मोन वाढवण्याचा कोणताही नैसर्गिक मार्ग नाही. मात्र ही समस्या अगोदरच आढळून आल्यास आवश्यक उपाययोजना करता येतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com