

Balancing Scientific Diet and In-Laws' Experience in Baby Care
Sakal
डॉ. स्मिता प्रकाश जोशी, समुपदेशक
प्रश्न : माझे बाळ सहा महिन्यांचे असून त्याच्या आहाराबाबत मी बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेते. डॉक्टरांनी एक वर्षापर्यंत बाळाला अतिरिक्त साखर व मीठ न देण्याचा सल्ला दिला आहे. बाळाच्या जन्माच्या सहा महिन्यांनंतर मी ऑफिसला जाऊ लागले आणि दिवसभर बाळाला सासूबाई सांभाळू लागल्या. त्या बाळाला हळूहळू गोड पदार्थ आणि मीठ घातलेले पदार्थ देऊ लागल्या आहेत. मी त्यांना सांगितले, तर त्या म्हणतात, ‘मला बाळे वाढवण्याचा खूप अनुभव आहे. मला शिकवू नकोस. मी माझी मुले अशीच वाढवली आहेत.’ त्यांच्या अनुभवाबद्दल मला आदर आहे; पण बाळाच्या आरोग्याबाबत मला तडजोड करायची नाही. त्यामुळे मी संभ्रमात आहे. मी डॉक्टरांचा सल्ला पाळावा की सासूबाईंच्या अनुभवावर विश्वास ठेवावा?