
आदर्श कोलेस्टेरॉल पातळी: चाळीशीच्या वरील व्यक्तींसाठी एकूण कोलेस्टेरॉल 200 mg/dL पेक्षा कमी, LDL 100 पेक्षा कमी आणि HDL 40-50 पेक्षा जास्त असावे.
वाईट कोलेस्टेरॉल नियंत्रण: ओट्स, फळे, नट्स यांचा आहार, नियमित व्यायाम आणि धूम्रपान टाळून LDL कमी करता येते.
जीवनशैली बदल: वजन नियंत्रण, तणाव कमी करणे आणि नियमित तपासणीमुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते.
वयाच्या चाळीशीनंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या वयानंतर लोकांना हृदयरोगांना सामोरे जावे लागते. या वयातील लोकांना उच्च रक्तदाब आणि उच्च रक्तातील साखरेसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. इतकेच नाही तर 40 वर्षांनंतर वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी देखील वाढते. कोलेस्ट्रॉलची वाढलेली पातळी हृदयरोग, स्ट्रोक आणि उच्च रक्तदाब यासारखे गंभीर आजार निर्माण करू शकते. यामुळे नियमितपणे कोलेस्ट्रॉलची तपासणी करणे खूप महत्वाचे आहे. पण वयाच्या चाळीशीनंतर लोकांमध्ये किती कोलेस्ट्रॉल असावे हे जाणून घेऊया.