
Chronic Myeloid Leukemia Can Be Now Controlled Without Medicines
sakal
क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया (Chronic Myeloid Leukemia – CML) साठीची तोंडावाटे घ्यायची औषधे पहिल्यांदा उपलब्ध झाली तेव्हा त्यांनी आजारासोबत जगण्याचा अर्थ नाट्यमयरित्या बदलून टाकला. एकेकाळी जीवघेण्या मानल्या जाणाऱ्या या आजाराला आता रुग्णांना दीर्घकाळापर्यंत हाताळता येण्याजोग्या स्थितीचे रूप आले. एकेकाळी जिवंत राहणे इतके एकच उद्दीष्ट बाळगले जात असताना अचानक बहुसंख्यांसाठी ती एक आवाक्यातली गोष्ट बनली.
दोन दशकांनंतर आता मात्र एक नवीन प्रश्न उदयाला आला आहे: फक्त जिवंत राहणे पुरेसे आहे का? या प्रश्नाला उत्तर नकारार्थी येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण आणि डॉक्टर्समध्ये “मी किती काळ जगेन?” या प्रश्नाऐवजी, “मी किती चांगल्या तऱ्हेने जगू शकेन?” या प्रश्नावर चर्चा होऊ लागली आहे.