Cinnamon Tea Benefits: मासिक पाळीतील सर्व समस्यांवर उपायकारक असा दालचिनी चहा

मासिक पाळीदम्यान तुम्हाला दालचिनीचा Cinnamon tea चहा पिणं फायदेशीर ठरू शकतं. कारण दालचिनीमध्ये सिनामेट, सिनामिक ऍसिड तसंच यातील सिनामल्डडिहाइडमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीइन्फ्लामेटरी म्हणजेच दाहक-विरोधी आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात
Cinnamon Tea
Cinnamon TeaEsakal

पीरियेड्स म्हणजेच मासिक पाळी हा ही महिलांसाठी अत्यंत त्रासदायक असते. मासिक पाळी दरम्यान प्रत्येक स्त्रीला वेगवेगळ्या त्रासाचा आणि वेदनांचा सामना करावा लागतो. यात पोट दुखी, कंबर दुखी, मळमळणे, डोके दुखी, अशक्तपणा अशा अनेक समस्याचा महिलांना पाळी दरम्यान सामना करावा लागतो. cinnamon tea benefits marathi what is right way to make cinnamon tea for period pain

याशिवाय काहीजणींना जास्त ब्लड फ्लो किंवा क्लॉटसहमुळे वावरणं कठीण होतं. साधारण १५ ते ३५ वयोगटातील महिलांना या समस्या अधिक भेडसावतात. या सर्वातून आराम मिळावा म्हणून अनेक महिला पेन किलर्स घेतात. मात्र या गोळ्या घेणं हे महिलांसाठी भविष्यात धोकादायक ठरू शकतं. 

मासिक पाळी Menstrual Cycle दरम्यान होणारा त्रास आणि वेदनांमुळे अनेक वेळा कॉलेज किंवा ऑफिसला जाणंही कठिण होतं. अनेकांना या वेदनांमधून आराम मिळावा म्हणून विश्रांतीसाठी देखील वेळ नसते त्यामुळे गोळ्या Medicines घेऊनच दिवस काढावा लागतो. मात्र या सगळ्यांवर एक नैसर्गिक उपाय गुणकारी ठरू शकतो. तो म्हणजे दालचीनीचा चहा cinnamon tea. भारतातील प्रत्येक घरामध्ये गरम मसाल्यामधील दालचीनीचा ही उपलब्ध असतेच. याच दालचिनीचा चहा पीरियड्समध्ये तुम्हाला आराम देऊ शकतो. 

दालचिनीतील औषधी गुणधर्म

मासिक पाळीदम्यान तुम्हाला दालचिनीचा Cinnamon tea चहा पिणं फायदेशीर ठरू शकतं. कारण दालचिनीमध्ये सिनामेट, सिनामिक ऍसिड तसंच यातील सिनामल्डडिहाइडमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीइन्फ्लामेटरी म्हणजेच दाहक-विरोधी आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दालचिनी पावडर आणि तेलाच्या स्वरूपात मासिक पाळीसंबधीत अनेक समस्या सोडवण्यासाठी वापरली जाऊ शकते. cinnamon tea for period pain मासिक पाळी दरम्यान दालचिनीचा तुम्ही कसा वापरू करू शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे देखिल वाचा-

Cinnamon Tea
Tea Side Effects: चहा पिल्याने खरचं उर्जा मिळते का?

मासिक पाळीसाठी दालचिनीचा चहा उपयुक्त

  • मासिक पाळीमध्ये सकाळी दालचिनीचा चहा घेतल्यास दिवसभरात होणारी मळमळ कमी होवू शकते. या काळात हार्मोनल बदलांमुळे अनेकांना मळमळ होण्याचा त्रास होता. यासाठी दालचिनीमधील युजेनॉल हे घटक मळमळ होण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या हार्मोन्सला नियंत्रणात आणण्याचं काम करतं. त्यामुळे दालचिनीचा चहा हा एक नैसर्गिक पर्याय वापरणं उत्तम राहिल,

  • मासिक पाळी दरम्यान महिलांना पोटात आणि पोटाच्या खालच्या भागात वेदना ते.होतात. मासिक माळीमधील या वेदनांना डिसमेनोरिया dysmenorrhea असं म्हणतात. या वेदनांचं प्रमुख कारण म्हणजे तयार होणारे प्रोस्टॅग्लॅडिन हार्मोन्स.या हार्मोन्समुळे गर्भाशयात आकुंचन निर्माण होतं यामुळेच तीव्र वेदना होतात. या वेदना रोखण्यासाठी दालचिनीचा चहा मदत करू शकतो. cinnamon tea benefits.

  • अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान जास्त ब्लड फ्लोची Cinnamon for heavy bleeding समस्या असते. यामुळे दिवसभर अस्वस्थ आणि वावरणं तर कठिण होतच शिवाय अशक्तपणा, चक्कर येणे, कळा येणे अशा समस्याही निर्माण होतात. दालचिनी गर्भाशयातून रक्तप्रवाह कमी करण्यास मदत करतं. मासिक पाळी दरम्यान किंवा त्यापूर्वी दालचिनी चहाच्या सेवनामुळे पाळीतील ब्लड फ्लो कमी होण्यास मदत होते. 

  • बऱ्याचदा पाळीमध्ये मूड स्विंगसमुळे महिलांची चिडचिड होते. अनेकींना नैराश्य येत यासाठी दालचिनी हा उत्तम पर्याय आहे. दालचिनीचा अनोखा सुगंध तुमचा मूड एकदम फ्रेश करायला मदत करू शकतो. यासाठी केवळ दालचिनीचा चहा तुम्ही घेऊ शकता. किंवा या काळात तुम्ही नेहमी घेणाऱ्या चहामध्ये किंवा कॉफीमध्येही दालचिनी पावडर टाकून मूड फ्रेश करू शकता. आहारत दालचिनीचा समावेश केल्ययाने तुम्हाला आनंदी आणि शांत वाटेल.

  • दालचिनीमध्ये असलेल्या अँडीऑक्सिडंट, अँटीइन्फ्लामेटरी आणि अँटीफंगल गुणधर्मांमुळे पचन होण्यास मदत होते. ब्लड शुगर नियंत्रणात राहते आणि मासिक पाळीमधील वेदना कमी होण्यासही मदत होते. Cinnamon for Nausea

  • वैद्यकिय आभ्यासातील पुरक उपचारांनुसार दालचिनीमुळे मासिक पाळीमध्ये होणारी पोट फुगण्याची समस्या तसचं जळजळ कमी होण्यास मदत होते. 

असा बनवा दालचिनी चहा

एक कप दालचिनी चहा बनवण्यासाठी दीड कप पाणी उकळत ठेवा. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्याच दालचिनी पावडर टाका. cinnamon tea recipe दोन मिनिटे उकळल्यानंतर हा चहा गार करून गाळून पिऊ शकता. दालचिनी पावडर उपलब्ध नसल्यास अख्या दालचिनीचा एक तुकडा तुम्ही दोन कप पाण्यात उकळावा. पाणी अर्धे झाल्यानंतर तुम्ही ते गार करून पिऊ शकता. यात तुम्ही मधही टाकू शकता. 

या दालचिनी चहाच्या सेवनाने तुम्ही पीरियड्समध्ये होणाऱ्य़ा त्रासापासून सुटका मिळवू शकता. शिवाय दररोज दालचिनीच्या चहाचं सेवन केल्यास वजन घटण्यासही मदत होवू शकते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com