छत्रपती संभाजीनगर : मागील पंधरवाड्यात फेइंगल चक्रीवादळामुळे थंडीचा कडाका कमी झाला होता; मात्र सध्या या वादळाची तीव्रता कमी झाल्याने पुन्हा थंडीचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..हिवाळा सुरू झाला असतानाच अधूनमधून पाऊस पडत आहे. यामुळे वेगळेच वातावरण तयार झाले असून, दमा, अस्थमा व श्वसनाचे विकार असणाऱ्या रुग्णांनी काळजी घेण्याची गरज आहे. तसेच पोटाचे विकारही वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने पारा घसरत आहे. हवेतील धुळीच्या कणांमुळेही आजारात वाढ होऊ शकते. यासाठी नागरिकांनी आहार घेताना काळजी घेणे गरजेचे आहे. रोजच्या आहारात भाज्या अनिवार्य असून फळेही खावीत. शीतपेय घेणे टाळण्याची गरज आहे. तसेच मास्क वापरणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले..११ ते ता. १३ डिसेंबरदरम्यान हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतका राहील. तोपर्यंत थंडीचे प्रमाण मध्यम स्वरूपात राहील. मात्र, शनिवारी (ता. १४) हवेच्या दाबात वाढ होईल आणि तो १०१२ हेप्टापास्कलपर्यंत जाईल. दरम्यान, किमान तापमानात घट होताच हवेच्या दाबात वाढ होऊन शनिवारपासून थंडीत वाढ होणार असल्याचे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले..यासंदर्भात डॉ. साबळे म्हणाले, सध्या अगदीच कडाक्याची थंडी नसली, तरी काही जिल्ह्यांतील ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोग पडण्याची शक्यता आहे. ता. ११ ते ता. १४ डिसेंबर या चार दिवसांत लगोलग पावसाची शक्यता नाही. मात्र, बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रनिर्मितीची शक्यता वाढली आहे. या आठवड्यात हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची व्याप्ती वाढून अरबी समुद्राच्या दक्षिणेकडच्या भागात हवेच्या कमी दाबाची व्याप्ती वाढेल आणि हवामानबदल जाणवेल. याचा परिणाम राज्यावर जाणवणार नाही..काय घ्यावी काळजीथंड पदार्थांचे सेवन करु नये.धुळीत जावे लागत असेल तर मास्क वापरावा.गरज नसेल तर गारव्यात बाहेर पडू नये.ज्याची ॲलर्जी त्यांचे सेवन टाळावे.घरातही धूळ स्वच्छ करताना मास्क वापरावा.काही त्रास जाणवल्यास तज्ज्ञांशी संपर्क साधावा..या पिकांची घ्या काळजीकांदा, लसूण, मिरची, हरभरा, गहू, तूर या पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्याचा बंदोबस्त वेळीच करावा. भाजीपाल्यावरही कीड वाढण्याची शक्यता आहे. तुडतुडे किड्यांपासून आंबा मोहराचे संरक्षण करावे. जनावरांना बंदिस्त शेडमध्ये बांधावे. कुक्कुटपालनाच्या शेडमध्ये बल्ब लावावेत. मोसंबी व्यवस्थापन करताना योग्य प्रमाणात योग्य खते द्या. योग्य प्रमाणात खते, पाणी दिल्यास फळगळ होणार नाही, असेही डॉ. साबळे म्हणाले..NCP Leader : राष्ट्रवादीच्या वाल्मीक कराड, चाटेवर खंडणीचा गुन्हा; पवनचक्कीच्या कंपनीला मागितले दोन कोटी.दमा,अस्थमा असलेल्या रुग्णांना थंडीत अधिक त्रास जाणवतो. वायु प्रदूषणामुळेही असे होऊ शकते. त्यामुळे असा त्रास असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांशी बोलून औषधांचा डोस व्यवस्थित घ्यावा. रुग्णाची प्रकृती पाहुन ते मात्रा कमी अधिक करु शकतात. काही लोकांमध्ये नुसता खोकला असल्याचे समोर येते. परंतु, त्यांनीही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.— डॉ. अविनाश लांब,श्वसनविकार तज्ज्ञ, घाटी रुग्णालयहवेचा दाब वाढताच तापमानात घट होते. परिणामी, थंडीचा कडाका वाढतो. ता. ११ डिसेंबरपासून राज्यातील सर्वच जिल्ह्यांत थंडी वाढेल; मात्र शनिवारी (ता. १४) अगदी कडाक्याची थंडी पडणार आहे. त्यानंतर हवामान अंशतः ढगाळ राहील. त्यामुळे काही अंशी कमी झालेली थंडी पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे.— डॉ. रामचंद्र साबळे,ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.