Cold Weather and Pneumonia: Sakal
आरोग्य
Cold Weather and Pneumonia: थंडीमुळे न्यूमोनियाचा ‘ताप’, लहान मुले अन् ज्येष्ठांची घ्या खास काळजी
Cold Weather and Pneumonia: तापमानाचा उतरलेला पारा, हवेत वाढलेले प्रदूषण, सकाळी पडणारे धुके यामुळे फ्लू, न्यूमोनिया तसेच श्वसनाशी संबंधित आजारांमध्ये वाढ झालेली आहे
Cold Weather and Pneumonia: गेल्या काही आठवड्यांपासून शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. अशातच काही वेळा ढगाळ वातावरणही अनुभवायला मिळत आहे. यामुळे न्यूमोनिया व विषाणूजन्य आजारांमध्ये वाढ होत आहे. सध्या अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक या सर्वच वयोगटांत न्यूमोनियाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे थंडीत आरोग्याची काळजी घेणे, पथ्ये पाळणे गरजेचे असल्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.