
Antibiotics Testing at BJ Hospital
sakal
Antibiotics Testing: गंभीर संसर्ग झालेल्या रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करावे लागते. त्यांचा आजार साधारण प्रतिजैविकांनी (जीवाणूविरोधी औषध) बरा होत नाही, त्यांना ‘कोलिस्टिन’ प्रतिजैविक दिले जाते. परंतु, त्याचा रुग्णांवर प्रतिकूल परिणामही होऊ शकतो. त्यातच ते या रुग्णांवर काम करेल की नाही? हे पाहण्यासाठीची प्रक्रियाही महागडी व वेळखाऊ आहे. मात्र, बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यावर झालेल्या संशोधनातून पूर्वीच्या पद्धतीपेक्षाही कोलिस्टिन ब्रॉथ डिस्क इल्यूशन (सीबीडीई) पद्धत अचूक आणि कमी खर्चिक असल्याचे आढळल्याने ती उपयुक्त ठरत आहे.