नको ती सर्दी

Common Cold Causes, Symptoms and Ayurvedic Remedies : ऋतुमानातील बदल, थंड हवा, धूळ आणि बदलते वातावरण यामुळे सर्दीचा त्रास वाढू शकतो. सर्दीची पूर्वलक्षणे ओळखून योग्य काळजी, आहार आणि वैद्यकीय सल्ल्याने त्रास कमी करता येतो.
Common Cold Causes, Symptoms and Ayurvedic Remedies

Common Cold Causes, Symptoms and Ayurvedic Remedies

esakal

Updated on: 

डॉ. मालविका तांबे

ऋतुमानात किंवा वातावरणात थोडा बदल झाली की अनेकांना सर्दीचा त्रास होत असतो. सध्या ऋतीसंधीमुळे अनेक जण सर्दीच्या आजाराने बेजार आहेत. सर्दीची लक्षणे, त्यावर काय काळजी घ्यायची याची प्राथमिक माहिती सर्वांनाच असणे आवश्‍यक आहे.

गेल्या आठवड्यात काही कारणानिमित्त विमानाने प्रवास केला. विमानाच्या आत बसल्यावर ते जाणवलं की किमान सत्तर टक्के तरी लोक सर्दी, पडसं, खोकला अशा आजाराने त्रस्त होते. विमानामधील वातानुकूलन यंत्रणा सुरू झाल्यावर मात्र सगळीकडेच खोकल्याची जुगलबंदी सुरू झाली. एकूणच या काळामध्ये सगळीकडेच लोकांना सर्दी खोकल्याचा त्रास जास्त प्रमाणातच होताना दिसतोय. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत कोणालाही कधीही खूप सहजपणे होणारी आणि भरपूर त्रास देणाऱ्या आजाराचा विचार केल्यास त्याला सर्दी असं उत्तर लगेचच मिळेल. आयुर्वेदामध्ये सर्दी पडशाला प्रतिशाय असं म्हटलं जातं. ज्या विकारामध्ये कफ इत्यादी दोष श्वसनमार्गातून अर्थात नाकातून बाहेर पडतात त्याला प्रतिशाय असं म्हटलं जातं.

Loading content, please wait...