दुधा ऐवजी 'या' पदार्थांचे सेवन करणे ठरू शकते धोकादायक, काळजी घ्या!

दूध (Milk)
दूध (Milk)

वाढते वजन आजकालच्या काळात सामान्य गोष्ट आहे. अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे(lifestyle) लोकांचे वजन(Weight) खूप पटकन वाढते. अशामध्ये बहूतेक लोक विशेषत: महिला किंवा तरुणी (Women and Girls)आपल्या वजनाबाबत खूप सतर्क राहायला लागत आहे. वजन नियंत्रित करण्यासाठी लोक आपल्या डाएटमध्ये (Diet)खूप बदल करतात आणि अशा गोष्टी खातात ज्यामुळे त्यांचे वजन निंयत्रित(Controlling Weight) करता येईल. पण तुम्हाला माहितीये का असे केल्याने शरीरामध्ये पोषक तत्वांची (Nutrients) कमतरता जाणवत नाही.

कित्येक लोक असे मानतात की, डेअरी प्रोडक्ट(Dairy Product) वजन वाढविण्यासाठी कारणीभूत ठरतात आणि डेअरी प्रोडक्ट ऐवजी बदाम मिल्क (Almond Milk) किंवा सोया मिल्क (Soya Milk) इ. गोष्टी वापरतात. पण, तुम्हाला माहितीये का? असे केल्याने तुमच्या आरोग्यासाठी खूप नुकासनदायक ठरू शकते विशेषत: महिला आणि तरुणींसाठी. (Consumption of these foods instead of milk can be dangerous be careful)

फुड अॅन्ड न्युट्रिशयन एक्सपर्ट (Food and nutrition expert) प्रोफेसर इयान गिवेंसने दूधाला पर्याय जसे की, ओट्स,बदाम आणि सोयाच्या दूधाचे सेवन करण्याबाबत्द सावधगिरी बाळगण्याचा इशारा देतात. डेअरी प्रॉडक्टमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असले तरी त्यामधून आरोग्यास जास्त फायदे होत नाही जितके गायीच्या दूधामधून होतात.

दूध (Milk)
रात्री वारंवार झोप मोड होतेय? तुमच्या चूकीच्या सवयी असू शकतात कारण

प्रोफेसर गिवेनने चिंता व्यक्त करताना म्हणाले की, ''आजच्या काळत तरुण मुली आपल्या डाएटमध्ये डेअरी प्रॉडक्ट्स काढून टाकतात आणि शरीराला मिळणाऱ्या गरजेच्या पौषक तत्वांसोबत समझोता करतात.''

त्यांनी हे देखील सांगितले की, '' मुलींनी आपल्या डाएटमधून रेड मीटचे सेवन देखील कमी केले आहे ज्यामुळे शरीरासाठी आवश्यक पोषक तत्व कमतरता जाणवते.

रिडिंग यूनिवर्सिटीमध्ये इंस्टीट्यूट फॉर फूड, न्युट्रिशन अॅन्ड हेल्थचे अधिकारी प्रो. गिवेंसने सांगितले की, ''डाएटमधून रेड मीट आणि डेअरी प्रॉडक्ट काढून टाकण्यामुळे महिलांनी शरीराचे नुकसान जास्त होत आहे. त्यांनी सांगितले की, ''चिंतेचे गोष्ट ही आहे की, या बाबतीत अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यामध्ये तरुण मुलं आपल्या डाएटमध्ये बदल करतात आणि असे पर्याय निवडतात ज्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता होऊ लागते.

दूध (Milk)
Belly Fat सर्वात धोकादायक का? शरीरात कोणत्या प्रकारचे फॅट्स असतात

डाटामधून असे समजले आहे की, ''११ ते १८ वयोगटातील जवळपास अर्ध्या मुलींमध्ये समान वयोगटातील मुलांच्या तुलनेत ११ टक्के आयरन लेव्हल कमतरता दिसून येते. तेच १९ ते ६४ वयोगटातील महिलांमध्ये आयरनची कमतरता दिसून येते.''\

बीन्स, नट्स आणि ड्राय फ्रुट्समध्ये आयरनच्या पातळीत कमी असते पण मीट याचे प्रमाण भरपूर असते. आयरनची कमतरतेमुळे शरीरामध्ये रक्ताची कमतरता आणि हिमोग्लोबिनची कमतरता होते. त्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता होते. त्यामुळे थकवा आणि एकाग्रतेची कमतरता होते, हे अॅनिमियाच्या लक्षणांपैकी एक लक्षण आहे.

राष्ट्रीय आहार आणि पोषण सर्वेक्षणमधून समजले आहे की, ''एक चतुर्थांश मुली खूप कमी प्रमाणात आयोडीन, कॅल्शिअम आणि झिंकचे सेवन करतात त्याचे एक मुख्य कारण दूधाचे न पिणे हे देखील आहे.

प्रो गिवेंसने सावधिगिरीचा इशारा दिला की, ''डेअरी प्रोडक्ट आयरनचा सर्वात चांगला सोर्स असतात. तसेच माशांमध्येही ते भरपूर प्रमाणात असते.''

एक्सपर्टने हे देखील सांगितले की, ''ज्या मुलींना किशोरवयीन काळात शरीरामध्ये कोणतीही कमतरतेचा सामना करावा लागतो, त्यांना मॅनोपॉजनंतरही जास्त त्रास होऊ शकतो.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com