Immunity Boost Tips : कोरोनाच्या BF.7 व्हेरिएंटचा वाढता धोका; अशी वाढवा इम्युनिटी

चीनमध्ये ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट BF.7 ने अक्षरक्षः धुमाकूळ घातला आहे.
Immunity Boost Tips
Immunity Boost Tips Sakal

Tips To Boost Immunity : चीनमध्ये ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट BF.7 ने अक्षरक्षः धुमाकूळ घातला आहे. त्यात भारतातही या व्हेरिएंटच्या तीन रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

Immunity Boost Tips
China BF.7 Variant : चीनचा व्हेरिएंट येतोय ; नागरिकांनो घाबरू नका; काय म्हणाले डॉ. रवी गोडसे

चीनमधील वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर भारतासह अनेक देशांनी पुन्हा एकदा सावध पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. वाढत्या रूग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज आपण कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमध्ये इम्युनिटी कशी वाढवता येईल याबाबतच्या काही टिप्स सांगणार आहोत..

इम्युनिटी हे कोरोनाविरुद्धचे आतापर्यंतचे सर्वात मोठे शस्त्र असल्याचे सिद्ध झाले आहे. मजबूत इम्युनिटीच्या जोरावर करोडो लोकांनी कोरोनाला हरवले असल्याचे यापूर्वीदेखील अधोरेखित झाले आहे.

Immunity Boost Tips
Hybrid immunity काय असते ? याने बूस्टर डोजची आवश्यकता भासणार नाही! वाचा डॉक्टरांचा सल्ला

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट विरोधात लढण्यासाठी नागरिकांनी इम्युनिटी अधिक बळकट करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रोग प्रतिकारशक्ती मजबूत असल्यास आपले शरीर कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करू शकते. त्यामुळे आहार आणि जीवनशैलीबाबत काही गोष्टींची काळजी घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती सहज मजबूत करता येणे शक्य असल्याचे मत आहार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Immunity Boost Tips
Corona Virus in India : भारतात कोरोनाचे किती व्हेरिएंट्स आहेत? BF.7 ला घाबरण्याची गरज आहे?

अशाप्रकारे करता येईल इम्युनिटी बूस्ट

  • कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येत इम्युनिटी वाढवण्यासाठी आहारात अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. फळे आणि भाज्यांचे भरपूर सेवन करावे. संत्री आणि लिंबासारखे पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. याशिवाय कोरफड आणि आवळा यांचेही सेवन केल्यास इम्युनिटी बूस्ट होण्यास मदत होऊ शकते.

  • हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी लोक आले, मध, तुळशीची पाने, कच्ची हळद आणि अक्रोडाचे सेवन करतात. रात्री एक ग्लास दुधात चिमूटभर हळद टाकून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Immunity Boost Tips
तुम्हालाही रोग प्रतिकारक शक्ती कमी वाटतेय का? आधी ही लक्षणं आहेत का बघा
  • रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी, दररोज व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. दररोज सुमारे 30 मिनिटे व्यायाम केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.

  • पुरेशी झोप घेतल्यानेदेखील रोगप्रतिकारक शक्ती अधिक बळकट होण्यासम दत होते. त्यामुळे दररोज 7-8 तास झोप घेण्याचा प्रयत्न करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com