Hybrid immunity काय असते ? याने बूस्टर डोजची आवश्यकता भासणार नाही! वाचा डॉक्टरांचा सल्ला

हायब्रीड इम्युनिटी ही अशी इम्युनिटी आहे जी संक्रमणानंतर तुमच्या शरीरात तयार होत असते.
What is Hybrid immunity, read about it
What is Hybrid immunity, read about itesakal

कोरोनानंतर सगळ्यात जास्त जर का कशावर परिणाम झाला असेल तर ती आहे रूग्णांची इम्युनिटी. आता इम्युनिटीबाबत एक नवीन अपडेट पुढे येतेय. नोएडाच्या जेपी हॉस्पिटल मध्ये रेस्पिरेटरी अँड क्रिटिकल केयर मेडिसिन डिपार्टमेंटचे डायरेक्टर डॉ. ज्ञानेंद्र अग्रवालच्या मते, कोरोना संक्रमण लोकांच्या शरीराला उध्वस्त करतेय. मात्र एकदा या संक्रमणातून बरं झाल्यावर शरीरामध्ये वायरसशी लढणारी नॉर्मल इम्युनिटी तयार होत असते. (What is Hybrid immunity, read about it)

हायब्रीड इम्युनिटीबाबत बोलायचं झालं तर हायब्रीड इम्युनिटी प्राप्त झाल्यावर संक्रमण एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत पसरण्याची शक्यता फार कमी असते. मात्र संक्रमणातून प्राप्त झालेल्या इम्युनिटीने वायरसपासून सुरक्षा होत असली तरी वॅक्सिन घेणं कोविड १९ साठी इम्युनिटी विकसित करण्याचा सुरक्षित उपाय मानल्या जातो. कोविड १९ वॅक्सिन कोविड सारख्या गंभीर आजारापासून रूग्णांची सुरक्षा करण्यास समर्थ आहे. सायन्स इम्यूनोलॉजीमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, या वॅक्सिनमुळे कोविड रूग्णांमध्ये रोगप्रतिकारक्षमता वाढली असून मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे.

What is Hybrid immunity, read about it
Corona Vaccination : ४ कोटी लोकांनी अद्याप एकही डोस घेतलेला नाही

Vaccine की Hybrid immunity काय आहे उत्तम ?

हायब्रीड इम्युनिटीमुळे तूर्तास रोगप्रतिकारशक्ती वाढते. मात्र संक्रमणापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी कोविड वॅक्सिन डोजच महत्वाचा ठरतो. कोविड महामारीमध्ये कोविड वायरसचे वेगवेगळे वॅरिअंट पुढे येत गेले. जरी वॅक्सिनेशनचा फायदा जास्त काळासाठी लोकांना होत नसला तरी वायरसपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी कोविड वॅक्सिनच महत्वाची ठरते. वॅक्सिनचे डोज कोविड वायरस नष्ट होतपर्यंत घेणे हाच एकमेव उपाय ठरतो.

डिस्क्लेमर: ही माहिती डॉक्टरांच्या सल्ल्याच्या आधारे घेतली असली तरी औषध किंवा वॅक्सिन घेताना प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com