
कोरोना कायमस्वरूपी राहू शकत नाही - विषाणूशास्त्रज्ञ
देशात कोरोना रूग्णसंख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. अशात कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी देशात योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. यासाठी लसीकरणावर अधिक भर दिला जातोय. लसीकरणामुळे कोरोना संसर्गाची वाढ कमी होण्यास मदत होणार असल्याचे विषाणूशास्त्रज्ञ डॉ. कुतूब महमूद यांनी एएनआयशी बोलताना सांगितले. कोरोना कायमस्वरूपी राहू शकत नाही आणि तो संपेल, असेही ते म्हणाले.
हेही वाचा: दिलासादायक! कोरोनाचा वेग मंदावतोय; WHOची माहिती
भारताने वर्षभरात ६० टक्के लसीकरण पुर्ण केले याविषयी डॉ. कुतूब महमूद यांनी कौतुक केले. "आपण खबरदारी म्हणून मास्क, हँड सॅनिटायझर्सचा वापर करत आहोत. आपल्याकडे लसीकरणासारखी मोठी शस्त्र आहे. कोणताही साथीचा रोग कायमस्वरूपी राहू शकत नाही आणि लवकरच कोरोना संपेल. आपण या क्षणाच्या खुप जवळ आलोय", असं डॉ. कुतूब म्हणाले.
हेही वाचा: ओमिक्रॉनची लागण झालेल्यांना कायमस्वरुपी प्रतिकारशक्ती मिळते?
सध्या देशात कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे. सोबतच लसीकरणाचा वेगही वाढतोय. मागील वर्षाच्या तुलनेत लसीकरण झपाट्याने होत आहे. ही लस उत्पादकांसाठी मोठी उपलब्धी असल्याचेही डॉ. कुतूब महमूद म्हणाले.
Web Title: Corona Cannot Last Forever Virologist
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..