ओमिक्रॉनची लागण झालेल्यांना कायमस्वरुपी प्रतिकारशक्ती मिळते?

तुमचे शरीर SARs-COV-2 विषाणू कसे लक्षात ठेवते? ओमीक्रॉनबाबत जाणून घ्या सर्वकाही
Omicron Virus
Omicron Virusesakal

भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ओमीक्रॉन व्हेरिअंटचा जगभरात वेगाने प्रसार होत आहे. आरोग्य अधिकाऱ्यांना वाढता संसर्ग दराची चिंता वाटत असून त्यांनी नागरिकांना कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे पण परंतु बाधितांची आकडेवारी उच्च पातळीवर पोहोचली तरीही, मोठ्या संख्येने लोक अस्वस्थ राहतात आणि प्रत्यक्षात आशा आहेत की, यामुळे SARs-COV-2 विषाणूविरूद्ध व्यापक प्रतिकारशक्ती निर्माण होईल.

नवीन कोरोना व्हेरिअंट धोकादाय डेल्टा व्हेरिअंटपेक्षा तुलनेने सौम्य आहे, जरी तो अत्यंत संसर्गजन्य असला तरीही, काही तज्ञांचा असा दावा आहे की, दीर्घकालीन नैसर्गिक प्रतिकारशक्तीसाठी टिकविण्यासाठी ते फायदेशीर ठरू शकते. बरेच काही अनुमानांच्या गृहित धरताना, आपण शक्यतांचा विचार करू या.

Omicron Virus
ओमीक्रॉन डेल्टापेक्षा कमी गंभीर व्हेरिअंट आहे का? काय सांगतात तज्ज्ञ

तुमचे शरीर SARs-COV-2 विषाणू कसे लक्षात ठेवते?

अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जे लोक COVID-19 मधून बरे होतात ते व्हायरसविरोधात मजबूत रोगप्रतिकारक प्रतिक्रिया विकसित करतात, ज्यामुळे त्यांचे भविष्यात पुन्हा संसर्ग होण्यापासून संरक्षण होते. यावरून स्पष्ट होते की, शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली व्हायरस लक्षात ठेवण्यास सक्षम आहे. पण कसे?

मानवी शरीराच्या दोन मुख्य संरक्षणाच्या सीमा रेखा आहेत, म्हणजे जन्मजात रोगप्रतिकारक प्रणाली आणि अनुकूली प्रतिकारशक्ती.

जन्मजात रोगप्रतिकारकशक्ती(innate immune) प्रतिसाद ही संरक्षणाची पहिला सीमा रेषा आहे जी विषाणूजन्य कण ओळखल्यावर लवकरात लवकर प्रतिकार करते. हे व्हायरसच्या प्रतिकृतीमध्ये अडथळा आणणारे प्रथिन निर्माण करण्यासाठी होस्ट सेलला चालना देते किंवा कॉम्प्रमाईझड पेशींना नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यासाठी रोगप्रतिकारक प्रणाली समाविष्ट करू शकते.

दुसरीकडे, अनुकूली प्रतिकारशक्ती(adaptive immune) प्रतिसादाला चालना देण्यासाठी अधिक वेळ घेते, कारण रोगप्रतिकारक यंत्रणेला विशेष आक्रमण सुरू करण्यापूर्वी प्रथम विषाणू आक्रमणकर्त्याला ओळखावे लागते. असे म्हटले आहे की, ''अनुकूली रोगप्रतिकारक प्रणाली मंद आहे आणि बी पेशी आणि टी पेशी त्यांच्या भूमिका घेण्यास बरेच दिवस लागू शकतात. एकदा विषाणू शोधून काढून नंतर, मेमरी टी आणि बी पेशी तयार केल्या जातात. एकाच रोगजनकाच्या संपर्कात येईपर्यंत हे सुप्त राहतात. ते केवळ विषाणूजन्य कण जलद ओळखत नाहीत तर तीव्र प्रतिक्रिया देखील देतात, ज्यामुळे दीर्घकालीन संरक्षण मिळते.

व्हायरस म्यूटेट करण्यासाठी प्रोग्राम केलेले आहेत आणि वेळोवेळी नवीन व्हेरिअंट निर्माण करतात. हे नवीन व्हेरिअंट उत्परिवर्तन(Mutation), विषाणू आणि तीव्रतेच्या बाबतीत मूळ स्ट्रेनपेक्षा (Strain)भिन्न असू शकतात.

ओमीक्रॉन व्हेरिअंट(Omicron Veriant)स्पाइक प्रोटीनमध्येच 30 पेक्षा जास्त उत्परिवर्तन(Mutation) आहेत हे लक्षात घेता, शास्त्रज्ञांनी असे म्हटले आहे की,''ते लसीपासून निर्माण झालेली प्रतिकारशक्ती टाळू शकतात आणि त्यामुळे ते वेगाने पसरू शकते. कोविड रुग्णांच्या संख्येत होणारी झपाट्याने वाढ, ओमिक्रॉनची वाढती आकडेवारी आणि कोरोना संर्सगाच्या प्रकरणांमध्ये झालेली वाढ ही प्रमुख तज्ञांनी केलेल्या बहुतांश दाव्यांचे समर्थन करते.

भारतात कोरोना व्हायरसची दुसरी लाट पसरविणारा डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत, नवीन ओमीक्रॉन व्हेरिअंट 4 पट जास्त संक्रमणीय आहे, परंतु कमी तीव्र आहे.

Omicron Virus
मानसिक तणावामुळे होऊ शकतो हार्ट अ‍ॅटॅक किंवा स्ट्रोक - संशोधन

अत्यंत संसर्गजन्य, सौम्य व्हेरिअंट म्हणजे कायम प्रतिकारशक्ती आहे का?

ओमीक्रॉन व्हेरिअंट आतापर्यंत सौम्य असल्याचे सिद्ध झाले आहे. हॉस्पिटलायझेशन आणि अतिदक्षता काळजीची आवश्यकता नसल्यामुळे, तज्ञांचा असा विश्वास आहे की ते व्यापक प्रतिकारशक्ती प्रदान करू शकतात, त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत नाही. दुसऱ्या लाटेदरम्यान, जरी मोठ्या लोकसंख्येने प्रतिकारशक्ती मिळवली, तरीही अनेकांनी गंभीर लक्षणांशी लढा दिला, तर या घातक विषाणूमुळे काही जण बळी पडले.

टॉप संसर्गजन्य रोग तज्ज्ञांचे मत आहे की, कोविडचा ओमिक्रॉन व्हेरिअंट संसर्ग न थांबवता येणारे आहे आणि शेवटी बूस्टर डोस घेतला असतानाही मोठ्या लोकसंख्येवर त्याचा परिणाम होईल.

तज्ञांनी असा दावा केला आहे की ओमिक्रॉन व्हेरिअंट मोठ्या लोकसंख्येला नैसर्गिक प्रतिकारशक्ती प्रदान करू शकतो आणि ते कोविड-19 ला महामारीमधून बाहेर काढू शकते. काहींनी असेही म्हटले आहे की सावधगिरीचे उपाय केल्याने केवळ सुपर-व्हेरिएंटची वाढ होईल, तर व्याोपक प्रतिकारशक्तीची शक्यता मर्यादित होईल.

अनेकांनी हे दावे केले आहे आहे त्यापैकी एका असे म्हटले आहे की, यामध्ये जोखीम खूप जास्त आहेत आणि व्हायरस मुक्तपणे पसरू दिल्यास आरोग्य सेवा प्रणालीवर परिणाम होऊ शकतो आणि ताण येऊ शकतो.

Omicron Virus
कोरोना 20 मिनिटांनंतर होतो 90% ने कमी संसर्गजन्य; संशोधनातून आलं समोर

ओमीक्राॉन हे COVID-19 विरुद्ध कायम प्रतिकारशक्ती देण्यासाठी एक 'नैसर्गिक लस' म्हणून कार्य करू शकते का?

अलीकडे, संशोधकांनी कल्पना मांडली आहे की, ''ओमिक्रॉन व्हेरिअंट 'नैसर्गिक लस' म्हणून काम करू शकते.'' युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगमधील व्हायरोलॉजिस्ट प्रोफेसर इयान जोन्स यांनी अलीकडेच या कल्पनेचे समर्थन केले आहे की, ''फ्लूप्रमाणेच, ओमिक्रॉन देखील निरोगी, तंदुरुस्त लोकांना कोणताही धोका देत नाही.'' जोखीम विचारात घेऊन त्यांनी असेही सांगतिल की, ''ओमिक्रॉन गंभीर आजार न होता प्रतिकारशक्ती वाढवू शकतो.''

याचा अर्थ आपण भविष्यातील कोविड संसर्गापासून व्यापक प्रतिकारशक्ती आणि संरक्षणाची अपेक्षा करू शकतो का?

एक प्रस्थापित व्हायरोलॉजिस्ट शाहिद जमील याला "धोकादायक कल्पना" म्हणतात, ती "सध्या उपलब्ध असलेल्या पुराव्यांपेक्षा साथीच्या आजारामुळे आलेला कंटाळा वाढविण्यास आणि अधिक काही करण्यास असमर्थ आहे."

"विशेषत: भारतात, जिथे कुपोषण, वायू प्रदूषण आणि मधुमेह मोठ्या प्रमाणावर आहे, लोकांना स्वेच्छेने एखाद्या विषाणूच्या संपर्कात येऊ देणे ज्याबद्दल त्यांना फारसे समजत नाही ते लोकांच्या आरोग्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य नाही," असेही ते पुढे म्हणाले.

INASACOG च्या सल्लागार गटाचे माजी प्रमुख, जमील यांनी असेही सांगितले की, जे लोक या कल्पनेचे समर्थन करतात ते दिर्घताळ कोरोनाचा विचार करत नाहीत.

Omicron Virus
हिवाळ्यात तुमच्या मुलांचे लसीकरण करणे का गरजेचे? जाणून घ्या

प्रतिकारशक्ती कमी होण्याचे संकट

SARs-COV-2 विषाणूंविरूद्ध प्रतिकारशक्तीचा प्रश्न असेल ते काही कालावधीत कमी होऊ शकते असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

द लॅन्सेट मायक्रोबमध्ये प्रकाशित येल स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार, ''लसीकरण न केलेल्या लोकांना कोविड-19 लागण झाल्यानंतर 3 ते 61 महिन्यांपर्यंत पुनर्संक्रमण होऊ नये यासाठी प्रतिकारशक्ती असली पाहिजे.''

जर्नल सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या जुन्या अभ्यासात असे आढळून आले आहे की,'' रोग प्रतिकारशक्ती 8 महिन्यांपर्यंत टिकू शकते.'' तर जर्नल इम्युनिटी अभ्यासात दावा केला आहे की,' कोविड-19 संसर्गापासून तयार होणारे अँटीबॉडी किमान 5-7 महिने टिकतात.''

यावरून हे स्पष्ट होते की, ''कोरोना रोग प्रतिकारशक्ती केवळ ठराविक कालावधीसाठी टिकते. याचा अर्थ दीर्घकाळात पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता असू शकते.'' वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)ने अहवाल दिला आहे की, 'प्राथमिक पुराव्यांवरून असे दिसते की, व्हेरिअंटच्या तुलतने ओमिक्रॉनमुळे पुन्हा संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो (म्हणजे, ज्या लोकांना पूर्वी कोविड-19 झाला आहे त्यांना ओमिक्रॉनने पुन्हा संसर्ग होऊ शकतो), पण माहिती मर्यादित आहे.

Omicron Virus
Weight loss: व्यायाम न करता वजन कमी करायचयं? कसे ते वाचा

निष्कर्ष

अशा वेळी, जेव्हा काहीही निश्चित नाही आणि Omicron बद्दल अधिक संशोधनाची प्रतीक्षा आहे, तेव्हा आपण लसीकरण गांभीर्याने घेणे महत्त्वाचे आहे. संक्रमणापासून प्रतिकारशक्ती किंवा लसीचे दोन डोस कालांतराने कमी होऊ शकतात हे लक्षात घेता, एखाद्याला त्याचे बूस्टर शॉट्स त्यांच्यासाठी उपलब्ध असताना मिळणे आवश्यक आहे.

त्याशिवाय, तुम्ही स्वत:च्या सुरक्षेसाठी सावधगिरी बाळगा, स्वतःला मास्क लावा, सामाजिक अंतर राखा.

अशा वेळी, जेव्हा काहीही निश्चित नाही आणि Omicron बद्दल अधिक संशोधनाची प्रतीक्षा आहे, तेव्हा आपण लसीकरण गांभीर्याने घेणे महत्त्वाचे आहे. संक्रमणापासून प्रतिकारशक्ती किंवा लसीचे दोन डोस कालांतराने कमी होऊ शकतात हे लक्षात घेता, एखाद्याला त्याचे बूस्टर शॉट्स त्यांच्यासाठी उपलब्ध असताना मिळणे आवश्यक आहे.

त्याशिवाय, तुम्ही स्वत:च्या सुरक्षेसाठी सावधगिरी बाळगा, स्वतःला मास्क लावा, सामाजिक अंतर राखा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com