esakal | 'कोरोनावर मात करणं सहज शक्य'; डॉक्टरांनी दिल्या खास टीप्स

बोलून बातमी शोधा

corona

'कोरोनावर मात करणं सहज शक्य'; डॉक्टरांनी दिल्या खास टीप्स

sakal_logo
By
शर्वरी जोशी

जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूच्या प्रकोपाला प्रत्येक जण कंटाळला आहे. आतापर्यंत अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर असंख्य जण या असाध्य आजाराशी सामना करत आहेत. यामध्येच गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर विविध अफवांना उधाण आलं असून नागरिकांमध्ये समज-गैरसमज निर्माण झाले आहेत. अनेक जण खात्री न करता अफवांवर विश्वास ठेवू लागले आहेत. विशेष म्हणजे कोविड लस घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोविड पूर्णपणे बराच होत नाही, अशी अफवा नागरिकांमध्ये पसरली आहे. मात्र, डॉ. प्रविणकुमार जरग यांनी सत्य परिस्थिती नेमकी काय आहे हे सांगितलं आहे.

दरम्यान, कोविड हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. परंतु, लस घेण्यापूर्वी किंवा लस घेतल्यानंतरही आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. मास्कचा लावणे, हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करणे हे सध्याच्या काळात गरजेचं आहे.