
Cough Syrup for Children | Contamination Revealed
sakal
Cough Syrup for Children: उपराजधानीतील मेडिकल, एम्स, इतर खासगी रुग्णालयांमध्ये मध्यप्रदेशातील कफ सिरप प्रकरणातील १५ तर संशियत मेंदूज्वरामुळे ६ अशा एकूण २१ मुलांचा मृत्यू झाला आहे. अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मंगळवारी खासगी रुग्णालयात ८ वर्षांच्या वेदांश पवार याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
मध्यप्रदेशातील कफ सिरप प्रकरणातील एकूण ३६ मुले शहरातील विविध रुग्णालयात दाखल होती. यापैकी १४ बालकांचा कफ सिरपमुळे मृत्यू झाला. यात छिंदवाड्यातील १३ आणि सिवनी येथील १ मधील मुलगा आहे. विशेष असे की, राष्ट्रीय प्रयोगशाळेकडे नमूने पाठवले आहे.