Pregnancy Syndrome in Men- Couvade Syndrome
sakal
आरोग्य
Couvade Syndrome: चक्क पुरुषांनाही जाणवतात प्रेग्नन्सीसारखी लक्षणं? जाणून घ्या काय आहे ‘कूवाडे सिंड्रोम’
Men Feeling Pregnancy Symptoms: जेव्हा एखादी स्त्री प्रेग्नन्ट असते, तेव्हा तिच्या जोडीदारालाही प्रेग्नन्सी मधील काही लक्षणांसारखे परिणाम दिसू शकतात. हे प्रेग्नन्सीमुले नाही तर भावनिक जडणघडण, ताण आणि हॉर्मोनल बदलांमुळे होते.
Pregnancy Symptoms in Men: तुम्ही कधीतरी “सिम्पथी वेट” किंवा प्रेग्नन्सीमध्ये जोडीदाराचंही वजन वाढलंय असं ऐकलं असेलच. पण काही पुरुषांसाठी हा अनुभव फक्त वजनापुरता मर्यादित राहत नाही. तर जेव्हा एखादी स्त्री प्रेग्नन्ट असते, तेव्हा तिच्या जोडीदारालाही प्रेग्नन्सी मधील काही लक्षणांसारखे परिणाम दिसू शकतात. यालाच कूवाड सिंड्रोम किंवा “सिम्पथेटिक प्रेग्नन्सी” असं म्हणतात. पण हो सिंड्रोम होण्यामागची कारणं काय आणि त्याचं लक्षणं कोणती ते जाणून घेऊया.
